प्रक्रियेकरिता कारखान्यात असलेला कच्चा माल अर्थात कचरा व प्लॅस्टिक.
प्रक्रियेकरिता कारखान्यात असलेला कच्चा माल अर्थात कचरा व प्लॅस्टिक. 
विदर्भ

चार युवकांनी सुरू केला कचऱ्यापासून फर्निचर तयार करण्याचा प्रकल्प

सुधीर भारती

अमरावती : घरातून निघणारा कचरा (Garbage coming out of the house), पन्नी, पर्यावरणासाठी घातक ठरणारे प्लॅस्टिक या सर्व घटकांमुळे शहरातील डंपिंग यार्ड ओव्हरफ्लो (Dumping yard overflow) झालेले आहेत. अशा परिस्थितीत डम्प झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्‍न महानगरपालिकांना तसेच प्रशासनाला पडला आहे. मात्र, अमरावतीच्या चार होतकरू तरुणांनी जिद्द आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर टाकाऊ कचऱ्यापासून आकर्षक फर्निचर (Attractive furniture from trash) तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आणि पर्यावरणपूरक प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या युवकांच्या प्रकल्पावर चौफेर अभिनंदनाचा वर्षांव करण्यात येत आहे. (Four young people started a project to make furniture from waste)

काही वर्षांत पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. घरातून निघणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तूचे करायचे काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातील प्लॅस्टिक कचरा सर्वांची डोकेदुखी आहे. मात्र, प्लॅस्टिक कचऱ्याचा उपयोग करून नवनवीन फर्निचर निर्माण करण्याचे प्रकल्प शहरातील चार युवकांनी सुरू केला. मधुर राठी, रोशन पीडियार, भूषण बूब व आशीष मोडक ही ती चार युवक आहेत. सध्या ते बिझनेस पार्टनर्सची आहेत. त्यांनी प्लॅस्टिक कचऱ्यापासून फर्निचर बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या या व्यवसायाला प्रतिसाद मिळेल किंवा नाही ही शंका असताना ग्राहकांनी डोक्यावर घेतले.

उद्योग सुरू करताना या युवकांसमोर अनेक अडचणी आल्या. परंतु, त्यांनी हिंमत हरली नाही. लोकांच्या घरातून निघणाऱ्या कचऱ्याची साठवणूक करण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यावर त्यांनी मात केली. घराघरांतून, वस्त्यांमधून निघालेला कचरा जमा करण्यासाठी चौघांनी एमआयडीसीमध्ये शेड भाड्याने घेतले. तेथे गोळा केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली. त्यापासून आकर्षक फर्निचर तयार करण्याचा उद्योग सुरू केला. रिसायकल बेल प्रा. लि. नावाने त्यांनी उद्योगाला सुरुवात केली. त्यांच्या कारखान्यामध्ये ४० प्रशिक्षित कर्मचारी काम करीत आहेत. एमआयडीसीमधील डी-२५ येथील कारखान्यात हा नावीन्यपूर्ण उद्योग सुरू झाला.

प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून साकारलेले आकर्षक फर्निच

नगरपालिकांनी डंपिंग यार्डमधील कचरा आम्हाला आणून द्यावा, त्या बदल्यात आम्ही शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणारे पर्यावरणपूरक प्लॅस्टिक बेंचेस, खुर्च्या तयार करून देऊ, असे रोशन पीडियार सांगतात. तसेच कचऱ्यापासून निर्मित वस्तू महानगरपालिका आणि संबंधित संस्थांना देण्यात येईल. यामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल तसेच चांगले पर्यावरण निर्माण होण्यास मदत होईल, असेही रोशन सांगतो.

उद्योग करण्याची संधी

एकीकडे कचरा प्लॅस्टिकचे करायचे तरी काय, असा प्रश्‍न सर्वांनाच पडत असला तरी अमरावतीच्या या युवकांनी मात्र त्यावरील उत्तर शोधून सर्वांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. काही वर्षांत उद्योग आणि व्यवसायात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना नवनवीन व्यवसाय आणि उद्योग करण्याची संधी मिळत आहे. यातूनच अमरावतीच्या या चार युवकांनी हा उद्योग सुरू केला आहे.

कचऱ्यापासून फर्निचरची निर्मिती करणारे मधुर राठी, रोशन पीडियार, भूषण बूब आणि आशिष मोडक
केवळ व्यवसायासाठी आम्ही हा कारखाना सुरू केलेला नाही. पैसे कमाविण्यासाठी इतरही अनेक उद्योग आहेत. मात्र, आम्ही पर्यावरणाशी निगडित प्रश्‍नावर काम करण्याचे ठरविले आहे. पर्यावरण तसेच समाजासाठी घातक प्लॅस्टिक व कचऱ्याचे आमच्या माध्यमातून निर्मूलन झाले पाहिजे, काहींना रोजगार मिळावा, या हेतूने आम्ही हा प्रयोग सुरू केला आहे. समाजातील घटकांकडून योग्य प्रतिसाद मिळाल्यास याच माध्यमातून आणखी काही प्रयोग साकारण्याचा आमचा निर्धार आहे.
- रोशन पीडियार, संचालक रिसायकल बेल प्रा. लि

(Four young people started a project to make furniture from waste)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिरंजीवीला पद्मविभूषण तर होर्मुसजी एन कामा यांना पद्मभूषण, अनेक दिग्गजांचा आज राष्ट्रपतींकडून सन्मान!

Sushma Andhare: मराठी माणसाच्या मुद्द्यावरुन सुषमा अंधारेंचं रेणुका शहाणेंना पत्र; म्हणाल्या, आक्रस्ताळेपणा करणाऱ्यांना...

PBKS vs RCB Live Score : विराटनंतर विल जॅक्सची फटकेबाजी; आरसीबीची दमदार सुरूवात

SRH vs LSG: हैदराबाद बॅटिंग करताना खेळपट्टी बदलली? कॅप्टन कमिन्सनं दिलं भन्नाट उत्तर

VIDEO: 2023 मध्ये एका कुटुंबाला एलियन दिसल्याचा व्हिडिओ खोटा नाही! तज्ज्ञांनी केला दावा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT