corona virus in washim.jpg 
विदर्भ

Coronavirus : चौदा नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह; आता आठ अहवालांची लागली प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रामधून संदिग्ध रुग्णांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 14 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, आठ अहवाल अप्राप्त आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.

जिल्ह्यात दिवसेंदिवस महानगरांतून परतणार्‍यांची संख्या वाढत आहे. ही बाब पाहता जिल्ह्यातही कोरनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महानगरांतून, जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना 14 दिवसांकरिता विलगीकरणात ठेवले जात आहे. तसेच त्यांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का देखील मारण्यात येत आहे. 

तसेच या नागरिकांवर स्थानिक पातळीवरील समितीचे देखील लक्ष राहत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा आहे. मात्र, ज्यांना कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत आहेत. अशा रुग्णांचे स्वॅब अहवाल तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांची संख्या देखील वाढत आहे. 

गुरुवारी (ता.21) रात्री उशिरा 13 अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्राप्त झाले. तसेच आज (ता.22) एक अहवाल असे मिळून एकूण 14 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ही बाब जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग व जिल्हावासींसाठी दिलासादायक आहे.

आजची स्थिती.....
घेतलेले नमुने........142
पॉझिटिव्ह .............08
निगेटिव्ह ............126
अ‍ॅक्टीव रुग्ण..........06
अहवाल प्रतिक्षेत .....08
सुट्टी झालेले रुग्ण......02
मृत्यू....................01

एक अहवाल देखील निगेटिव्ह
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्रयोगशाळेकडे पाठविलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी 13 नमुन्यांचे अहवाल गुरुवारी (ता.22) उशिरा निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच आज (ता.23) सकाळी प्राप्त झालेला एक अहवाल देखील निगेटिव्ह आहे. तसेच सहा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशीम

दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट
जिल्ह्यात आजपासून (ता.22) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुभा दिलेली दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तर सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळात कोणत्याही व्यक्तीस संचारबंदीस मनाई करण्यात आली आहे. आज दुकाने उघडल्यानंतर काही व्यापार्‍यांनी दुपारी दोन नंतर आपली प्रतिष्ठाणे बंद केली. तर काही व्यापार्‍यांनी दुकाने सुरू ठेवली. मात्र, दुपारी दोन वाजतानंतर बाजारपेठेत शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Development Package : मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीतील कोटींची उड्डाणे हवेतच! धक्कादायक आकडेवारी समोर

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT