fraud of 2 crore rupees with partner in business at amravati  
विदर्भ

व्यवसायातील भागीदारांनीच केली दीड कोटींची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

संतोष ताकपिरे

अमरावती : भूखंड खरेदी-विक्रीच्या व्यवसायात भागीदार असलेल्या एकाची दीड कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली. त्याबाबत त्याने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार दोघा साथीदारांविरुद्ध विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

शिवनारायण रामप्रताप भुतडा (वय 65) व पुरुषोत्तम भगवान चव्हाण (वय 44, दोघेही रा. यवतमाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा साथीदारांची नावे आहेत. या दोघांच्या व्यवसायात काही दिवसांपर्यंत भागीदार असलेले प्रमोद नारायणदास बूब (वय 51, रा. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी (ता. 27) दत्तापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. खरेदी-विक्रीच्या व्यवसायात विश्‍वासात घेऊन बूब यांच्या कोऱ्या धनादेशावर दोघांनी स्वाक्षरी घेऊन ठेवल्या. त्याद्वारे बूब यांना न कळविता बाभूळगाव येथील को-ऑपरेटिव्ह बँकेमधून त्याच धनादेशाचा वापर करून दीड कोटी रुपये काढून खासगी कामासाठी भुतडा व चव्हाण यांनी वापरून फसवणूक केली, असा आरोप बूब यांनी केला आहे. शिवाय मौजा धामणगावरेल्वे येथील एका भूखंडामध्ये बनावट स्वाक्षरी करून त्या जागेचे विक्रीपत्रही करून घेतले, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला. सोमवारपर्यंत याप्रकरणी कुणालाही अटक झालेली नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल झाला त्या दोघांनाही चौकशीसाठी बोलविल्या जाईल. त्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील, असे दत्तापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद शेळके यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT