Fraud of 77 thousand rupees with a man in Amravati  
विदर्भ

गुगलवरून शोधला कस्टमर केअरचा नंबर; अप्लिकेशन डाउनलोड करताच लागला 77 हजारांचा चुना 

संतोष ताकपिरे

अमरावती ः ऑनलाइन वस्तू खरेदी केल्यानंतर गुगलवरून कस्टमरकेअरचा क्रमांक शोधून बॅंकिंगची माहिती अनोळखी व्यक्तीला शेअर करणे अनेकांना महागात पडत आहे. परतवाडा येथील एका व्यक्तीला तोतयाने 77 हजार 798 रुपयांनी चुना लावला.

मनीष ज्ञानेश्‍वर होले (वय 35, रा. गुरुकुल कॉलनी, परतवाडा), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्री. होले यांनी शॉप 101 वरून ऑनलाइन साडी 487 रुपयांमध्ये खरेदी केली. पैसेही ऑनलाइन पाठविले. परंतु चोवीस तास उलटूनही त्यांना ऑर्डर दिल्याचे दिसून आले नाही. श्री. होले यांनी कोठूनतरी कस्टमर केअरचा क्रमांक शोधून त्यावर संपर्क साधला. 

अशाप्रकारे अनोळखी व्यक्तींसोबत संपर्क साधणेच त्यांच्या अंगलट आले. ज्या क्रमांकावर संपर्क साधला, त्या व्यक्तीने श्री. होले यांना टेक्‍निकल इश्‍यू, असे उत्तर दिले. परंतु ऑर्डर रद्द करून पैसे परत पाठविल्या जाईल, असे उत्तर अनोळखी व्यक्तीकडून मिळाले. मात्र त्यासाठी त्या व्यक्तीने श्री. होले यांना एनी डेस्क हे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. 

सदर ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्याद्वारे तोतयाने श्री. होले यांच्याकडून बॅंक डिटेल्ससुद्धा मागवून घेतले. बॅंकखात्याशी संबंधित तांत्रिक माहिती शेअर करताच, त्यांच्या खात्यामधून 77 हजार 798 रुपये एवढी रक्कम तोतयाने आपल्या खात्यात ऑनलाइन वळती करून श्री. होले यांची फसवणूक केली. सदर व्यक्तीच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; इंडिया आघाडीच्या खासदारांना उद्देशून म्हणाले...

Manchar News : मंचर बाजार समितीत कोथिंबिरीला विक्रमी दर; जुडीला ३६ रुपये उच्चांकी भाव, २,५०० जुड्यांतून शेतकऱ्याला ८२ हजारांचा निव्वळ नफा

Gokul Election 2026 : ...अखेर 'गोकुळ'चा तिढा सुटला! महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित, मुश्रीफांची राष्ट्रवादी ठरली वरचढ; पाहा कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

SCROLL FOR NEXT