free food grains will provided to victims of heavy rains and floods esakal
विदर्भ

Maharashtra Flood News : अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मिळणार मोफत अन्नधान्य

प्रति कुटुंब १० किलो गहू, तांदूळ व ५ लिटर केरोसीनचा समावेश

संजय सोनोने

शेगाव : गत काही दिवसापासून राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी व महापुराचे थैमान सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे निराधार झालेल्या कुटुंबांना शासनाच्या आदेशानुसार मोफत अन्नधान्य व केरोसीनचा लाभ मिळणार आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवू निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ लिटर केरोसीन मोफत पुरविण्यास महसूल व वन विभागाच्या ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने या विभागाच्या ७ ऑगस्‍ट २०१९ च्या परिपत्रकान्वये अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थितीत अन्नधान्य वाटपाकरिता कार्यपद्धतीबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

महसूल यंत्रणेने पात्र ठरविलेल्या कुटुंबांनाच सदर अन्नधान्याचे वितरण करावयाचे आहे. त्यादृष्टीने महसूल यंत्रणेशी समन्वय साधून त्यांच्याकडून पात्र बाधित कुटुंबांच्या प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ लिटर केरोसिन मोफत वितरण तत्काळ करण्यात यावे असेही आदेशात म्हटले आहे.

संबंधित जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नवितरण अधिकारी, उपनियंत्रक शिधावाटप अधिकारी यांनी त्यांच्याकडे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिल्लक असलेल्या अन्नधान्यामधून आवश्यक अन्नधान्याचे वितरण करण्याचे आदेश असून, पूरग्रस्तांना वाटप केलेल्या अन्नधान्याची माहिती वेळोवेळी शासनास सादर करावी अशाही सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT