molestation 
विदर्भ

विवाहित मैत्रिणीला भररस्त्यात केली ही मागणी... वाचा काय झाले नंतर

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विवाहितेला तिच्या ओळखीतील मित्राने शरीरसुखाची मागणी केली. रस्त्यात गाठून मारहाण केली. तिने मदतीसाठी आरडाओरड केली असता, पळून जाताना तो रस्त्यात पडला, त्यामुळे काही लोकांनी त्याला पकडून फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले.

फ्रेजरपुरा हद्दीतील एका मुलाची आई असलेल्या महिलेचे पतीसोबत पटत नव्हते. त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. याच कालावधीत नरेंद्र रामदास आठवले (वय 31 रा. कवठाळ) याने पीडितेसोबत लग्न करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर दोघेही नोव्हेंबर 2019 पासून भाड्याची खोली घेऊन पती, पत्नीप्रमाणे राहू लागले.

एका महिन्यांनतर त्या दोघांनी फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत खोली भाड्याने घेतली. परंतु त्यानंतर नरेंद्र पीडितेला व तिच्या मुलाला मानसिक त्रास देत होता, असा पीडित महिलेचा आरोप आहे. त्यानंतर सोबत राहायचे नाही, म्हणून पीडितेने नरेंद्र सोबतचे संबंध तोडले. परंतु त्यानंतरही तो वारंवार फोन करून पीडितेचा पाठलाग करून शरीरसुखाची मागणी करीत होता.

- मोठी बातमी : गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडली ही गंभीर घटना, तीन नराधमांनी विद्यार्थिनीला नेले झुडपात

रस्त्यावर मारहाण

बाजारातसुद्धा त्याने अश्‍लील भाषेत पीडितेशी संवाद साधला. मंगळवारी (ता. 21) पीडितेने त्याप्रकरणात फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवून घराकडे परत जात असताना नरेंद्रने तिला पुन्हा रस्त्यात अडवून, तिच्याशी बळजबरीचा प्रयत्न केला असता, पीडितेने आरडाओरड केल्याने नरेंद्रने तेथून पळ काढला. काही लोकांनी पीडितेच्या मदतीसाठी धाव घेतली असता, पळताना नरेंद्र पडला, अन्‌ लोकांनी त्याला पकडले. फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT