अचलपूर : स्मशानभूमीत जळत्या मृतदेहाचे पावसापासून बचाव करताना नातेवाईक.  
विदर्भ

मरणानंतरही संपेनात माणसाच्या यातना...पावसात करावा लागतो मृतदेहावर अंत्यसंकार

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : परतवाडा शहराला लागूनच असलेल्या कांडली गावात स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाल्याने येथील गावकऱ्यांना अनेक गैरसोयींना तोंड देत अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे मरणानंतरही माणसाच्या यातना संपत नसल्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे.

परतवाडा शहराच्या अगदी लागूनच असलेल्या पंचवीस हजार लोकसंख्येच्या कांडली गावातील स्मशानभूमी गैरसोयींच्या विळख्यात सापडली आहे. मरणानंतरही येथे माणसाची छळातून सुटका होत नसल्याचे दिसून येते. येथील स्मशानभूमीत अनेक समस्या "आ' वासून उभ्या आहेत. मृतदेहाची अवहेलना तर होतेच, शिवाय अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना अनेक गैरसोयींना तोंड देत अंत्यसंस्कार करावा लागतो.

टिनाचे शेड फुटले, पावसात अंत्यसंस्कार

असाच प्रकार सहा जुलै रोजी घडला. भर पावसात एका पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावा लागला. परिणामी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांनी संताप व्यक्त केला. गावात स्मशानभूमी असणे सामाजिक गरज आहे. त्या स्मशानभूमीत सोयीसुविधा असणे अपेक्षित असते; तसेच आपण ज्या गावात जन्मलो; तेथेच आपल्याला मरण येऊन तेथेच आपला अंत्यसंस्कार व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
परंतु कांडली येथील स्मशनभूमीवरील टिनाचे शेड फुटल्याने ऊन, पावसातच अंत्यसंस्कार उरकावा लागतो.


ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन

स्मशानभूमीत स्वच्छतेचा अभाव असल्याने लोकांना अनेक समस्यांचा सामना तर करावाच लागतो, पण येथील गैरसोय बघून त्रासलेल्या जीवनातून मरणही नकोसे वाटते. या स्मशानभूमीच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील तरुणांनी प्रीतेश अवघड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिकारी विनोद मोरे यांना निवेदन सादर केले. या वेळी प्रीतेश अवघड यांच्यासह प्रथमेश ठाकरे, जय घोरे, अमन भंडारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT