gadchiroli angel deokule recorded in the champion book of world records 
विदर्भ

एंजल देवकुलेची चॅम्पियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, जागतिक स्तरावर सर्वात कमी वयाची सुवर्णपदक विजेती

मिलिंद उमरे

गडचिरोली : स्कॉय मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात वयाच्या पाचव्या वर्षापासून सुवर्णपदके जिंकत आलेली आणि गडचिरोलीची सुवर्णकन्या म्हणून ख्यातीप्राप्त एंजल देवकुले हिची चॅम्पियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नुकतीच नोंद झाली आहे. 

एंजल देवकुले सध्या येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात सातव्या वर्गात शिकत आहे. ती स्कॉय मार्शल आर्ट या खेळामध्ये जागतिक स्तरावरची सर्वात कमी वयाची सुवर्णपदक विजेती ठरली आहे. याची नोंद घेत चॅम्पियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या पुस्तकात एंजलच्या नावाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी २०१७ मध्ये थायलंड (चिंगमई) येथे आयोजित पाचव्या आशियायी स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदके आणि २०१८ मध्ये साउथ कोरिया येथे आयोजित तिसऱ्या विश्‍वचषक स्कॉय मार्शल आर्ट स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. २०१९ मध्ये याच खेळाकरिता राष्ट्रपती भवनात तिला सन्मानित करण्यात आले. तसेच २२ जानेवारी २०२० रोजी तिला राष्ट्रपती भवनात प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ती आशियातील ५ प्रभावशाली खेळाडूंमध्ये समाविष्ट झाली आहे. राज्याचे नगरविकास, पर्यावरण, पर्यटन व संसदीय कार्यमंत्री तथा ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरियानाचे राज्यपाल कप्तानसिंग सोलंकी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आदींनी एंजलचा गौरव केला आहे. 

एंजलने विविध स्पर्धांत आतापर्यंत ६० सुवर्णपदके व अनेक पुरस्कार पटकावले आहेत. तिला यशाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी तिचे मार्गदर्शक संदीप पेदापल्ली यांनी अथक परिश्रम घेतले. संस्थेचे महासचिव अजित नाथानी, प्राचार्य रहिम अमलानी यांनी एंजलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एंजलने आपल्या यशाचे श्रेय वडील विजय देवकुले, आई स्वाती देवकुले, अजीज नाथानी, प्राचार्य रहिम अमलानी तसेच मार्गदर्शक संदीप पेदापल्ली यांना दिले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT