विदर्भ

Gadchiroli : सर्पदंश झालेल्या मुलीला वाचविण्याऱ्या तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News: जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारासाठी तिला नेत होता. यावेळी मोटारीची धडक दुचाकीला बसली.

सकाळ डिजिटल टीम

Gadchiroli :सर्पदंश झाल्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या मुलीला उपचारासाठी दुचाकीवर घेऊन निघालेल्या राकेश किरंगे (वय २७) या तरुणाला मोटारीची जोरदार धडक बसली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला व इतर दोघे जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता.१०) गडचिरोलीजवळ घडली.

रानमूस येथील एका मुलीला साप चावला होता. ही मुलगी राकेशची नातलग आहे. तिचे प्राण वाचावे म्हणून तो दुचाकीवरून गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारासाठी तिला नेत होता. यावेळी मोटारीची धडक दुचाकीला बसली.

ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीचे पुढचे चाक निखळून पडले आणि मोटारीच्या पुढच्या भागाचा चेदामेंदा झाला. यात राकेशचा जागीच मृत्यू झाला. पण त्याच्या दुचाकीवर बसलेली महिला व सर्पदंश झालेली मुलगी दोघेही सुदैवाने वाचले आहेत. शिवाय मोटारीमधील गोरे परिवाराचे सदस्यही बचावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Cut September 2025: LPG सिलिंडर झाला स्वस्त! दिल्ली-मुंबईत किती घट? तपासा ताजे दर

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता महिलाही धडकणार, गौरी विसर्जनानंतर लढ्याला उतरणार!

Nagpur News : आईच्या प्रेमाऐवजी कैदेतलं बालपण...तीन वर्ष सूर्यप्रकाशही न पाहिलेली दोन लेकरं, हृदय पिळवटून टाकणारी घटना

Live Breaking News Updates In Marathi: आंदोलनात पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी सहभागी, उपोषणातही अभ्यास सुरू

Ganesh festival २०२५: टाळ्या अन्‌ शिट्ट्यांची साद! 'पुण्याच्या मध्यवस्तीत रविवारी गर्दीचा उच्चांक'; सुट्टीचा लुटला आनंद

SCROLL FOR NEXT