letter 
विदर्भ

गडचिरोलीच्या चिमुकलीने मुख्यमंत्र्याना लिहिले दुसरे पत्र, केली ही मागणी

सकाळवृत्तसेवा

घोट (जि. गडचिरोली) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशाला आणि महाराष्ट्राला मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. उद्योगपती व काही सामाजिक संघटना यासाठी मदत करत आहेत. परंतु आपल्याला आपली आरोग्य सेवा अजून बळकट करण्यासाठी अजून पैसे लागतील त्यासाठी मंदिर तसेच सर्वच धार्मिक संस्थांकडून दानाच्या स्वरूपातील आलेला निधीतील 50 टक्‍के रक्कम मंदिर ट्रस्टने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी काढावे असे पत्र घोट येथील नवोदय विद्यालयात सातव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या 12 वर्षीय अपेक्षा रामटेके हिने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

अपेक्षाने पहिल्या पत्रात फक्त मंदिरांकडून निधी घेण्याची मागणी केली होती तिचे सर्वत्र कौतुक झाले. पण मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती. फक्त मंदिरातूनच पैसे का मागावेत ? इतर धार्मिक संस्थांकडून का नाही ? यावरून सोशल मीडियावर या चिमुकलीवर टीका करण्यात आली होती. परंतु लोकांची मागणी सुद्धा काही चुकीची नव्हती हे तिला समजले आणि तिने परत एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. त्या पत्रामध्ये अपेक्षा हिने मंदिरांसोबतच इतर धार्मिक संस्थांसाठी सुद्धा आदेश काढावे की त्यांच्या जवळ दानाच्या स्वरूपात आलेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावे.

मंदिरांसोबतच इतर धार्मिक संस्था आहेत ज्यांच्या कडे सुद्धा दानाच्या स्वरूपात निधी जमा होतो. तिने आधीचे पत्र लिहीत असताना जे तिला टीव्ही वर किंवा साधारण लोकांच्या बोलण्यात येतात त्या मंदिरांच्या नावांचा उल्लेख केला होता. ते तिने लिहिणेही स्वाभाविक होते. पण जेव्हा टीव्ही, व्हाट्‌सअॅपवर तिच्या पहिल्या पत्रासंबंधात बातमी आली तेव्हा तिच्यावर टीका होत असतानाचे तिने अनुभवले. घराच्या परिसरातील काही लोकं सुद्धा तिच्या या पत्रावर टीका करत होते. परंतु लोकांच्या मागण्या सुद्धा काही चुकीच्या नाहीत, असे सांगत तिने पुन्हा एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले त्यात तिने फक्त मंदिरच नाही तर सर्वच धार्मिक संस्थांना दानाच्या स्वरूपात जमा झालेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आदेश काढा, असे पत्रात नमूद केले आहे.

पहिल्या पत्राबद्दल दिलगिरी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारला मदतीची मोठी गरज असल्याने अपेक्षा अस्वस्थ होती. त्यामुळे आपणही काहीतरी करावे या कल्पनेतून तिने जे समजल ते पत्रातून मुख्यमंत्र्याना लिहीले. मात्र, माझ्या आधीच्या पत्रामुळे ज्यांचे मन दुखावले असेल त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, मी माझ्या समजेनुसार ते लिहिले होते. आपण वडीलधारी म्हणून मला मार्गदर्शन करू शकता अशी प्रामाणिक भावना तिने व्यक्त केली. पहिल्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयातून उत्तर आले की. संबंधित विभागाकडे ते पाठवण्यात आले आहे. या सुद्धा पत्राची दखल मुख्यमंत्री नक्कीच घेतील अशी तिची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

Pune Voter Mapping: वडगाव शेरीत सव्वा लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण; उर्वरित मतदारांना SIR मोहिमेत लवकर सहभागी होण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT