गडचिरोली : जिल्ह्यातील पोमके गट्टा (जां) येथे आज जहाल नक्षलवादी अजय हिचामी (Maoist Ajay Hichami) याला अटक करण्यात आली. गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) आज नक्षलविरोधी अभियान राबवून ही कारवाई केली असून या नक्षलवाद्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते.
नक्षलवादी अजय हिचामी (३०) हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मौजा झारेवाडा येथील रहिवासी आहे. तो २०१९ मध्ये नक्षल गट्टा दलममध्ये भरती झाला होता. तसेच सध्या सशस्त्र दलम सद्स्य पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. सन २०२१ मध्ये पोमके गट्टावर दोन वेळा हल्ला झाला होता. तसेच पोमके बुर्गीवर देखील हल्ला झाला होता. यामध्ये या नक्षलवाद्याचा समावेश होता. तसेच १८ सप्टेंबरला सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याच्या खुनामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. 2019 पासून आतापर्यंत त्याच्यावर एकूण 03 खून, 05 चकमक व 01 दरोडा, असे एकूण 09 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 02 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. याशिवाय त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलिस दल करत आहे.
पोलिस उपविभाग हेडरीअंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा (जां.) हद्दीत आज ११ ऑक्टोबर रोजी तो नहलवादी हजर असल्याची गोपनिय माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.