Gadchiroli police force achieved success Four Naxalites arrested Naxal TCOC
Gadchiroli police force achieved success Four Naxalites arrested Naxal TCOC  sakal
विदर्भ

नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलास मिळाले मोठे यश

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या टिसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके धोडराज हद्दीत दि. २१/०४/२०२२ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे मौजा नेलगुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना चार जहाल नक्षलवाद्यांस अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे. नक्षलवादी साध्या वेषात गावामध्ये प्रवेश करून नक्षल कारवाई पार पाडणार आहेत अशी गोपनिय माहिती पोलीस दलास मिळाल्याने पोलीस दलाकडून पार पाडण्यात आलेल्या अभियाना दरम्यान ०४ जहाल नक्षलींना अटक करण्यात यश आले.

अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये १) बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे वय ३० वर्ष रा. नेलगुंडा ता. भामरागड २) मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे वय-३४ वर्ष रा. कनेली ता. धानोरा ३) सुमन ऊफ्र जन्नी कोमटी कुड्यामी वय २४ वर्ष पडतमपल्ली ता. भामरागड ४) अजित ऊर्फ भरत रा. झारेवाडा ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांचा समावेश आहे. जहाल नक्षली बापु वड्डे हा कंपनी क्र. १० मध्ये एसीएम पदावर कार्यरत होता दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी पोमके कोठी अंतर्गत पोलीस शिपाई दुशांत पंढरी नंदेश्वर यांच्या खुनामध्ये याचा सक्रीय सहभाग होता. तसेच त्यांचा ७ खुन, ३ चकमक, १ जाळपोळ, २ दरोडा, अशा एकुण १३ गुन्हयामध्ये समावेश आहे. मारोती गावडे हा गट्टा दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. त्यांचा गुन्हयामध्ये समावेश आहे. सुमन कुड्यामी ही पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तीचा ०३ खून व ०८ चकमक अशा एकुण ११ गुन्हयामध्ये समावेश आहे. एकुण ०३ चकमकीच्या

दिनांक १३/०४/२०२२ रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (जा.) हद्दीमध्ये नामे अशोक ऊर्फ नविन पेका नरोटे व मंगेश मासा हिचामी या दोन निरपराध आदिवासी नागरिकांच्या खुनाच्या कटामध्ये जहाल नक्षली मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे व अजित ऊर्फ भरत रा. झारेवाडा ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांचा सक्रीय सहभाग होता. नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने १) बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे याचेवर ८ लक्ष रुपये. २) मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे याचेवर ६ लक्ष रूपये. ३) सुमन ऊफ्र जन्नी कोमटी कुड्यामी हीचेवर २ लक्ष रुपये व अजित ऊर्फ भरत याचेवर २ लक्ष रूपये असे एकुण १८ लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या व्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात पार पडले. मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT