विदर्भ

गडचिरोलीत अवैध दारूचा महापूर; लांझेडामधील अड्ड्यावर पोलिसांचा छापा

खुशाल ठाकरे

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) दारूबंदी असली, तरी जिल्ह्यात ठिकठिकाणी दारू मिळते. आता केवळ ग्रामीण किंवा सीमावर्ती भागातच नाही, तर गडचिरोली शहरातील लांझेडा परिसरातसुद्धा दारूचा महापूर वाहत आहे. गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने लांझेडा वॉर्डातील दारूविक्रेत्यांच्या घरी धाडी टाकत 5 हजार 200 रुपयांची 26 लिटर मोहफुलाची दारू (Wine) जप्त केल्याने हे विदारक सत्य उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश विजय पिपरे व लालाजी एकनाथ सुरजागडे दोन्ही रा. लांझेडा, अशी आरोपींची नावे आहेत. (Gadchiroli police raid on illegal wine )

शहरातील लांझेडा वॉर्डात अवैध दारूविक्री होत असल्यामुळे वॉर्डवासींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वॉर्ड संघटनेच्या महिलांनी वारंवार सूचना करूनही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. वॉर्डातील दोन घरी अवैध दारूविक्री सुरू असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने प्रकाश विजय पिपरे या दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता 2 हजार 200 रुपये किंमतीची 11 लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. तसेच लालाजी एकनाथ सुरजागडे याच्याकडील 3 हजार रुपये किंमतीची 15 लिटर मोहफुलाची दारू ताब्यात घेण्यात आली. असा एकूण 5 हजार 200 रुपयांची 26 लिटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली.

याप्रकरणी दोन्ही दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भास्कर ठाकरे, हवालदार प्रमोद वाळके यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते. पण, लांझेडा परिसरात करण्यात आलेली ही कारवाई अतिशय छोटी असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. येथे अनेक अवैध दारूविक्रेते असून ते बिनबोभाट आपला दारूविक्रीचा व्यवसाय करत आहे. त्यामुळे मुक्तिपथ व पोलिस विभागाने या परिसरावर सातत्याने लक्ष ठेवून येथे अवैध दारूविक्री करणाऱ्यांना चाप लावावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

त्या महिलांचे काय ?

लांझेडा परिसरात केवळ पुरुषच नाही, तर काही महिलासुद्धा दारूविक्री करतात. या संपूर्ण परिसरात सर्वांनाच या महिला, जिथे त्या दारूविक्री करतात ते घर, ती गल्ली, असे सारेच माहित आहे. पोलिस विभाग व मुक्तिपथलाही कदाचित ही माहिती असावी. येथे दारू पिणाऱ्यांची रात्रंदिवस गर्दी असते. असे असतानाही या महिलांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्या अधिकच निर्ढावल्या असून बिनधास्त दारूविक्री करत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असतानाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांच्यावर नेमका कुणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

(Gadchiroli police raid and seized illegal wine )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

Harman Investment Pune : पुण्यात होणार तब्बल ३४५ कोटींची गुंतवणूक; ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार नोकऱ्या

Latest Marathi News Live Update : सासवडसह परिसरात जोरदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT