Rajoli Village Under Water sakal
विदर्भ

Gadchiroli Rain Update : तीन दिवस राजोली गाव होते पाण्यात; अनेकांची घरे पडली

गडचिरोली जिल्ह्यात कोसळत असलेल्या संततधार पावसादरम्यान सोमवार (ता. १७) ते बुधवार (ता. १९) असे सलग तीन दिवस राजोली गाव पाण्यात होते.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - जिल्ह्यात कोसळत असलेल्या संततधार पावसादरम्यान सोमवार (ता. १७) ते बुधवार (ता. १९) असे सलग तीन दिवस गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव जवळचे राजोली हे गाव पाण्यात होते. या गावा जवळपास साडेचार ते पाच फुट उंचीपर्यंत पाणी होते.

त्यामुळे अनेकांची घरे पडली, अन्नधान्याचे नुकसान झाले असून आम्हाला आठ दिवसांत नुकसान भरपाई देण्यासह आमच्या गावाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी पत्रकार परीषदेत केली.

पुराचा जोर ओसरताच राजोलीतील ग्रामस्थांनी कशी बशी वाट काढत गडचिरोली शहर गाठले. येथे त्यांनी गुरुवार (ता. २०) पत्रकार परीषदेत आपबिती सांगितली. ग्रामस्थ म्हणाले की, सोमवार रात्रीपासून बुधवारपर्यंत पुराचे पाणी गावात होते. गाव चहुबाजुंनी पाण्याच्या वेढ्यात होता.

यात काहींची घरे पडली, काहींची गुरे पाण्यात वाहून गेली, घरात पाणी शिरून होते नव्हते सगळे गेले. बुधवारी प्रशासन मदतीला पोहोचले. ती दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येत्या आठ दिवसांत नुकसान भरपाई द्यावी तसेच गावाचे पुनर्वसन लवकर करावे, अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

या पत्रकार परीषदेला सरपंच कांता हलामी, उपसरपंच लंकेश कन्नाके, पोलिस पाटील वामन बांबोळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणपत कुळमेथे व ग्रामस्थ उपस्थित होते.

यापूर्वी दोनदा आला होता पूर...

या गावात यापूर्वी १९९४ मध्ये आणि ९ सप्टेंबर २०१० मध्ये असा दोनदा भयानक पूर आलेला आहे. तेव्हापासून या गावाच्या पुनर्वसनाची मागणी होत आहे. पण अद्याप या गावाची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT