bribe sakal
विदर्भ

Gadchiroli : लाच स्वीकारताना तलाठ्याला अटक

१५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अधिकाऱ्यांला रंगेहाथ पकडले

सकाळ वृत्तसेवा

१५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अधिकाऱ्यांला रंगेहाथ पकडले

गडचिरोली : गिट्टीची वाहतूक करताना जप्त केलेले टिप्पर व ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तसेच पुन्हा नियमित वाहतूक करू देण्यासाठी एका वाहतूकदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे (वय ४४) यास रंगेहाथ पकडून अटक केली.

प्राप्त माहितीनुसार तक्रारकर्ता ट्रॅक्टर आणि टिप्परद्वारे गिट्टीची वाहतूक करतो. १० ऑक्टोबरला वाहतुकीदरम्यान त्रुटी आढळल्याने तलाठी नरेंद्र ठाकरे याने टिप्पर पकडून नंतर तो सोडून दिला. परंतु टिप्पर सोडण्याचा मोबदला म्हणून १० हजार आणि बेतकाठी साजाच्या हद्दीतील खाणीतून नियमित गिट्टी वाहतूक करू देण्यासाठी दरमहा १० हजार अशी २० हजार रुपयांची लाच तलाठी ठाकरे याने तक्रारकर्त्यास मागितली. तडजोडीअंती तो १५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.

परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला.

तलाठी नरेंद्र ठाकरे यास रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई एसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलिस नाईक राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, हवालदार तुळशीराम नवघरे आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT