gamblers ran through the rivers as police came  
विदर्भ

नदीच्या कडेला जंगलात सुरु होते 'हे' काम; पोलिसांना बघताच नदीत टाकल्या उड्या.. नक्की काय घडले 

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया :  तालुक्‍यातील नवरगावजवळील नदीच्या कडेला असलेल्या जंगलात जुगार सुरू असल्याची माहिती होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांना पाहून काही जुगाऱ्यांनी नदीत उड्या टाकल्या. त्यापाठोपाठ पोलिसांनीदेखील नदीत उड्या टाकून जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. काहींना जंगलात पाठलाग करून पकडले. ही कारवाई सोमवारी (ता.14) सायंकाळी पाचच्या सुमारास केली. ताब्यात घेण्यात आलेल्या नऊ आरोपींकडून 9 दुचाकींसह 6 लाख 4 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नवरगावजवळील नदीच्या कडेला असलेल्या जंगलात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जंगलात पोहोचले. या वेळी त्यांना ग्रीन मॅटवर बसून जुगाराचा खेळ सुरू असल्याचे दिसले. पोलिस पथक दिसताच काही जुगाऱ्यांनी जंगलात धूम ठोकली. त्यांना पोलिसांनी पाठलाग करीत पकडले. काही जुगाऱ्यांनी नदीत उड्या घेतल्याचे समजताच पोलिसांनीदेखील नदीत उड्या मारून जुगाऱ्यांना सिनेस्टाईल पकडले.

कमलेश सुरेंद्र बन्सोड (वय 28, रा. टेमनी), कोहिनूर छगनलाल वासनिक (वय 34, रा. गुदमा), काजू अनंतराम हुकरे (वय 36, रा. गुदमा), सतीश तेजराम मेंढे (वय 31, रा. सुपलीपार), रितेश अरुण बोरकर (वय 26, रा. संजयनगर, गोंदिया), अजय जुगलकिशोर सोनकर (वय 33, रा. शास्त्री वॉर्ड, गोंदिया), अभिषेक रिंकूसिंग बैस (वय 24, रा. गौतमनगर, गोंदिया), जितेंद्र मनमोहनसिंग पारासर (वय 38, रा. छोटा गोंदिया), प्रवीण अशोक आंबेडारे (वय 28, रा. फुलचूर, गोंदिया) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

घटनास्थळाहून किसन दमाहे (रा. इर्री) हा त्याची बुलेटसह (एमएच 35-ए. एफ. 3088) पसार झाला. तसेच जंगलात अन्य 4 ते पाच जण दुचाकी सोडून पळून गेले. या दुचाकी पोलिस पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. या कारवाईत 22 हजार 240 रुपये रोख, 7 मोबाईल, 9 दुचाकी असा एकूण 6 लाख 4 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यांनी केली ही कारवाई

पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, पोलिस उपनिरीक्षक आनंद बिचेवार, पोलिस कर्मचारी लिलेंद्र बैस, गोपाल कापगते, चंद्रकांत करपे, विजय रहांगडाले, भूवनलाल देशमुख, भुमेश्‍वर जगनाडे, रेखलाल गौतम, दिनेश लोधी, प्रवीण चामट, संतोष चव्हाण, रूपराम पटले, शशिकांत भेंडारकर, संजय हूड, विनोद हरिणखेडे यांनी ही कारवाई केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT