garden
garden  
विदर्भ

अमरावतीत घराच्या टेरेसवर फुलले रंगीबेरंगी छटांचे ऍडेनियम

भूषण काळे

अमरावती : छंदासाठी वाट्टेल ते. असे म्हणत रामेश्‍वर पावडे यांनी घराच्या टेरेसवरच वाळवंटी गुलाबाची बाग फुलवली. त्यांच्या देखभालीने आणि मेहनतीने त्या गुलाबाच्या झाडांना विविधरंगी फुले लागली आहेत. अमरावती शहरातील टावर लाइन रोडवरील वीर तानाजीनगर येथील रामेश्‍वर पावडे यांचे टेरेस गार्डन गुलबाने सजले आहे. या फुलांना सुगंध नाही, पण त्याच्या निरनिराळ्या रंगांच्या छटांनी अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे. ऍडेनियम (वाळवंटी गुलाब), असे या फुलाचे नाव आहे.

रामेश्‍वर पावडे हे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात सांख्यिकी विभागात लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीला याच महाविद्यालयात ते गार्डनिंगचे काम करीत होते. तेव्हाचे प्राचार्य डॉ. वसंत घुरडे यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी हा छंद जोपासला. विशेष म्हणजे, शहरात वाळवंटी गुलाबाचा बगीचा फुलविण्याचा मान त्यांनाच आहे. घरातील आवारात नव्हे तर त्यांनी चक्क आपल्या छतावरच हा बगीचा फुलविला आहे. त्यांच्यासोबतच पत्नी, मुलगा-मुलगी या बगीच्याची देखभाल करतात.

अरब टू अमरावती
ऍडेनियमला मराठीत वाळवंटी गुलाब असे म्हणतात. अरब, आफ्रिका येथून फुलाचा उगम झाला आहे. अमरावतीत पहिल्यांदा रामेश्‍वर पावडे यांनी या फुलाचे झाड आणले. साधारण चार ते पाच फुटांपर्यंत या फुलाचे रोपटे वाढते. तर उगम झालेल्या ठिकाणी 11 फुटांपर्यंत या रोपट्याची वाढ होत असल्याचे रामेश्‍वर पावडे यांनी सांगितले.

स्वतःच्या व्हेरायटी
रामेश्‍वर पावडे यांच्याकडे जवळपास 30 भिन्न रंगांचे वाळवंटी गुलाब आहेत. विशेष म्हणजे, एकाच रंगाच्या तीन ते चार वेगवेगळ्या जाती त्यांच्याकडे आहेत. सोबतच त्यांनी स्वतः निरनिराळ्या प्रकारच्या ऍडेनियमच्या व्हेरायटी तयार केल्या आहेत.

सविस्तर वाचा - नागपुरात कोरोना सुसाट

आवड बनला व्यवसाय
सुरुवातीला एक आवड अन्‌ छंद म्हणून त्यांनी ऍडेनियमचा बगीचा फुलविला. मागील दहा वर्षांपासून त्यांच्या घराच्या टेरेसवर ही बाग आहे. याचेच छोटेछोटे रोपटे तयार करून ते त्याची विक्रीही करतात. साधारणतः 100 ते 200 रुपयांना एक कुंडी याप्रमाणे ते ऍडेनियमची विक्री करतात.

उन्हाळ्यात रंगीबेरंगी माहोल
ऍडेनियमला नोव्हेंबरनंतर फुले येतात. पावसाळ्यात फुलांचे प्रमाण कमी राहते. परंतु वर्षभरही ऍडेनियमच्या रोपट्याला फुले येत राहतात. रंगीबेरंगी फुलांचा ऍडेनियम एकदमच नजरेत भरणारा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT