Ghamapur village in yavatmal suffering from diseases of kidneys
Ghamapur village in yavatmal suffering from diseases of kidneys  
विदर्भ

घमापूर बनत चाललंय मृत्यूपूर! गावाला अचानक किडनीच्या आजारांचा विळखा; आतापर्यंत तब्बल १५ जणांनी गमावले प्राण 

अरविंद ओझलवार

उमरखेड (जि. यवतमाळ.) : घमापूर (तांडा) हे उमरखेड तालुक्‍यातील जंगलाच्या कुशीत निसर्गमय वातावरणात वसलेले गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास दोन हजारांच्या आसपास आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या गावाला किडनीच्या आजाराने विळखा घातला आहे. आतापर्यंत 15 ते 20 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे.

घमापूर (तांडा) येथील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आहे. त्यातील बहुतांश लोक अल्पभूधारक शेतकरी आहेत. आर्थिक अडचणीतील नागरिकांना किडनीच्या आजारामुळे नवीन समस्येला सामोरे जावे लागत आहे. या गावात दरवर्षी जवळपास दहा ते 15 लोकांना किडनीचा आजार होतो. तर अनेकांना दर वर्षी डायलिसिससारख्या महागड्या उपचारासाठी नागपूर, नांदेड, पुसद या सारख्या शहरात दवाखान्यात जावे लागते. 

आतापर्यंत जवळपास 15 ते 20 किडनीच्या आजारामुळे दगावले आहेत. गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आजाराचा विळखा घट्ट होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात ग्रामपंचायतकडून वॉटर फिल्टर बसविलेले आहे. मात्र, ते वर्षातून फार कमी दिवस सुरू असतो आणि इतर काळात तो धुळखात बंद पडलेला असतो.

यासंदर्भात गावकऱ्यांनी अने गमावले क वेळा तक्रारी केल्या. मात्र, कुणाकडूनही दखल घेतली गेली नाही. शंभरच्या घरात नागरिक किडनीच्या आजाराने बेजार आहेत. डायलिसिससारख्या महागडा उपचार करताना त्यांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. या आजाराने तरुणांनाही सोडले नाही. मृत्यूचे तांडव आजही लोक आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

घमापूर येथे 1996पासून किडनी आजाराला सुरुवात झाली. या गंभीर समस्येकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गावातील महिला, पुरुष, तरुण आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. रोज मजुरी करणाऱ्या नागरिकांना डायलिसीसचा खर्च परवडत नाही. त्यामुळे शासनाने मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यासह शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी.
-विशाखा जाधव, 
उपसभापती, पंचायत समिती, उमरखेड तथा रहिवासी घमापूर. (जि. यवतमाळ)

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT