file photo
file photo 
विदर्भ

मुख्यमंत्री, वनमंत्र्यांना बैलाची झूल भेट

सकाळ वृत्तसेवा

चिमूर (जि. चंद्रपूर) : मनसेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी क्रांतिदिनी 9 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन पाठविले होते. मात्र, मागण्यांसंदर्भात शासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे बुधवारी (ता. 21) मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री, वनमंत्र्यांसाठी तहसीलदारांकडे बैलाची झूल भेट देत निषेध नोंदविण्यात आला. पोळ्याच्या तोंडावर झूल भेट देण्याच्या या अभिनव आंदोलनाची तालुक्‍यात चांगलीच चर्चा आहे.
अंकूर कंपनीच्या "प्रभाकर' वाणाने तालुक्‍यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली. सदोष बीज असल्याचा अहवाल प्राप्त झाला. मात्र, कंपनीवर कोणतीच कारवाई झालेली नाही. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात नुकसानभरपाई द्यावी, नुकसानभरपाईची मर्यादा रद्द करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान द्यावे इत्यादी मागण्या मनसेच्या वतीने करण्यात आल्या होत्या. येथील हुतात्मा स्मारक येथून दुपारी साडेबारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर नायब तहसीलदार दरभे यांना मुख्यमंत्री, वनमंत्र्यांसाठी झूल भेट देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT