Girlfriend filed complaint against boyfriend for molestation
Girlfriend filed complaint against boyfriend for molestation 
विदर्भ

प्रेयसीचे चार वर्षे लैंगिक शोषण; प्रियकराविरूद्ध बलात्कारचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एका युवकाने "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत प्रेयसीचे सलग चार वर्षे शारीरिक शोषण केले. लग्नास नकार देऊन विश्‍वासघात केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून प्रियकराविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. रियांश सुखराम राजपूत (वय 23, रा. गजानन नगर, नाका नं. 2) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रियांश हा खासगी नोकरी करतो. एका कार्यालयात नोकरी करीत असताना कोराडी येथे राहणारी 25 वर्षीय युवती शैला (बदललेले नाव) हिच्यासोबत ओळखी झाली. शैलाने नर्सचे ट्रेनिंग केले असून काही दिवस नोकरीसुद्धा केली आहे. दोघांची ओळख झाल्यानंतर मैत्री झाली. त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर वारंवार भेटी-गाठी झाल्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वयाने दोन वर्षाने मोठी असलेल्या शैलाने रियांशला भाड्याने रूम घेऊन "लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहण्यासाठी ऑफर दिली. रियाशंने तिला लग्नाचे आमिष दिले. शैलाने त्याला लग्नाची गळ घातली. चार वर्षे पती-पत्नीप्रमाणे सोबत राहिल्यानंतर रियांशने लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या शैलाने जरीपटका पोलिस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून रियांशविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. 

शैलाविरूद्ध पोलिसात तक्रार 
शैलाला महागडे मोबाईल्स आणि कपड्यांची आवड आहे. त्यासाठी रियांशला तिने अनेकदा बॅंक खात्यात पैसे टाकण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेल केले. वारंवार पैसे मागत असल्यामुळे अनेकदा त्यांच्यात वाद झाले. मात्र, शैला त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात फसवेल, अशी धमकी देत होती. त्यामुळे रियांशनेही जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT