girls should be aware from misuse of profile pictures
girls should be aware from misuse of profile pictures  
विदर्भ

मुलींनो 'डीपी' सांभाळा !

भगवान वानखेडे

अकोला : तुमचे सोशल मीडियावर अकाऊंट आहे आणि तुम्ही व्हॉट्स अॅप, फेसबुकसारख्या माध्यमांवर स्वतःचा फोटो डीपी म्हणून ठेवत आहात. तर याबाबतीत तुम्हाला सजग होण्याची वेळ आली आहे. कारण टवाळखोर तुमचा फोटो कॉपी करून चुकीच्या ठिकाणी अपलोड करित आहेत. तर तुमच्या नावे खोटे अकाऊंट तयार करून अश्लील संभाषणही करित आहेत. तेव्हा मुलीनो सोशल मीडियाचा वापर करत असताना डीपी सांभाळा असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे.

बहुतांश मुलींचे सोशल मीडियावर अकाऊंट अआहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या मुली फेसबुक, व्हाटसपवर आपला स्वतःचा फोटो ठेवत आहेत. मात्र, अशा सार्वजनिक ठिकाणी प्रोफाईल फोटो ठेवणे मुलींसाठी घातक ठरत असल्याचे चित्र आहे. कारण, टवाळखोर तुमचा प्रोफाईल फोटो कॉपी करून खोटे अकाऊंट तयार करित आहेत. अनोळखी व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी अश्लील संभाषणही करित आहे. यातून तुमची बदनामी तर होतेच सोबत कोणी याबाबतीत तक्रार जरी दाखल केली तरी तो खटला तुमच्यावरच दाखल होतो. तेव्हा अशा सार्वजनिक ठिकाणी प्रोफाईल फोटो ठेवणे टाळावे, असे आवाहन सायबर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

खंडणीही मागितली जाते -
तुमच्या नावे खोटे अकाऊंट तयार करून अनोळखी व्यक्तीना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. अनोळखी व्यक्तींशी अश्लील संभाषण करून त्याचे स्क्रीन शॉट काढले जातात. सोबतच त्या व्यक्तीला ते तक्रार टाळायची असेल तर पैशाची मागणीही करित आहेत. तेव्हा या सगळ्या प्रकारापासून बचावासाठी मुलींनी सोशल मीडियावर फोटो वा संपर्क क्रमांक टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलींनी सार्वजनिक ठिकाणी पर्सनल होत स्वतःबाबत  वैयक्तीक माहिती टाकू नये. यातून तुमची बदमानी होते. बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी. 
- सीमा म. दाताळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर विभाग.

मुलीनी व्हाट्सअॅप किंवा फेसबुकवर फोटो अपलोड करताना आपल्याच संपर्कातील व्यक्तींशी तो शेअर करावा. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ नये.
- अंजली भोंगे, विद्यार्थिनी.

मुलींनी सोशल मीडियावर डीपी ठेऊच नये. जेणे करून आपली बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी. विशेष म्हणजे प्रत्येक अकाऊंटवर स्वतःचा फोटो ठेवणे अनिवार्य थोडी आहे.
- संध्या प्रजापती, विद्यार्थिनी.

तुमच्या प्रोफाईल फोटोचा कोणी कसा वापर करेल याची तुम्हालाही जाणीव नसते. तुमचा फोटो सार्वजनिक ठिकाणी टाकून चुकीच्या प्रतिक्रिया येऊ शकतात. यातून तुमची बदनामी होते. तेव्हा बदनामी होण्याच्या आधीच डीपी न ठेवलेला बरा.
- कविता दादाराव डांगरे, आयटीआय विद्यार्थिनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT