mobile 
विदर्भ

साडेतीन लाख द्या, अन्यथा व्हिडीओ करतो व्हायरल... विद्यार्थ्यांनी दिली विवाहितेला धमकी

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन विवाहितेला साडेतीन लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन विद्यार्थ्यांविरुद्ध अंजनगावसुर्जी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. 

आदित्य पाटील, प्रज्ज्वल भाष्कर व आदित्य अस्वार अशी त्या युवकाची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या युवकांनी एका विवाहित महिलेच्या मोबाईलवर 8 जून रोजी पहिल्यांदा संपर्क साधला. महिलेचे काही फोटो उपलब्ध असून, ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामीपासून वाचायचे असेल तर, तीन लाख पन्नास हजार रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी केली. या संदर्भात कुणालाही माहिती दिल्यास विवाहितेसह तिच्या पतीला जीवाने मारण्याची धमकी दिली. तक्रार करणाऱ्या महिलेस ठरलेल्या ठिकाणी शुक्रवारी (ता. 12) मध्यरात्री एका दुचाकीवर पैशाची थैली ठेवण्यास सांगितले होते. थैली ठेवल्यानंतर दुचाकी घेऊन काहीजण निघाले. तक्रारकर्त्याने त्यांचा पाठलाग केला. संशय आल्याने ते दुचाकी सोडून पळाले. तीन मोबाईल क्रमांकावरून त्यांनी महिलेशी संपर्क साधला होता. तीन ते चार दिवस तणावात असलेल्या महिलेने अखेर अंजनगावसुर्जी ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

व्हाट्‌सऍप केले हॅक 

खंडणी मागणारे तिघेही विद्यार्थी असून त्यापैकी एकाने विवाहितेचे व्हॉट्‌सऍप अकाउंट हॅक केले. त्यातून त्या महिलेचे काही पर्सनल फोटो प्राप्त करून हा कट रचला. त्यासाठी मुख्य सूत्रधारांनी आपल्या मित्रांच्या मोबाईलचा वापर केला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. अमरावती अंजनगावसूर्जी खंडणी

तीनही विद्यार्थ्यांना अटक झाली असून, न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (ता.15) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. ज्या मोबाईलचा त्यांनी गुन्ह्यात वापर केला ते जप्त केल्या जातील.  
- राजेश जावरे, पोलिस उपनिरीक्षक, अंजनगावसुर्जी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Corporation Protest: जंतर-मंतर आंदोलनाचे महापालिकेत पडसाद; सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी

Harmony Park: संगीताच्या सुरांमध्ये योगा आणि खेळ, ५० रुपयांच्या तिकिटात स्वप्नवत सफर! ३०० टन भंगारातून साकारल्या कलाकृती

Latest Marathi News Live Update : न्यायालयाने डॉ. मनोज शिरुरे यांचा जामीन अर्ज फेटाळला

सुबोध भावेने साकारली गोंदवलेकर महाराजांची भूमिका, अभिनेत्याबद्दल अनुभव सांगताना अर्थव सुदामे म्हणाला... 'त्यांनी पैसे...'

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

SCROLL FOR NEXT