विदर्भ

मृत कोरोना रुग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला

संतोष ताकपिरे

अमरावती : येथील कोविड रुग्णालयात (Covid Hospitals in Amravati) उपचार घेत असताना कोरोनामुळे एका महिलेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मृत महिलेच्या गळ्यातील 7 ग्रॅम सोन्याची 22 हजार रुपयांची पोत कुणीतरी चोरली. मृत महिलेच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी (ता. 22) अनोळखी व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. (gold chain stole by unknown people in covid hospital amravati)

बडनेरा नजीकच्या अंजनगावबारी येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी तीन मे रोजी येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना 19 मे रोजी त्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी महिलेच्या अंगावरील दागिने दिसले नाही.

मृत महिलेच्या नातेवाइकांनी यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली. त्यानंतर गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याआधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. यापूर्वीही अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी येथे उपचारादरम्यान चोरी होत असल्याच्या तक्रारी रुग्णालय प्रशासनाकडे केल्या होत्या. परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे कोविड रुग्णालयात चोरीच्या घटना वाढत आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज

कोविड रुग्णालयाच्या कामात पारदर्शकता राहावी, रुग्णांची योग्य पद्धतीने काळजी घेतल्या जाते, याची माहिती बाहेर एका स्क्रीनवर दिसावी, यासाठी कोविड रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमऱ्यांची संख्या वाढवावी ही मागणी अद्याप पूर्ण झाली नाही.

कोविड रुग्णालयात चोरी झाल्याच्या गुन्ह्यांची नोंद घेतली. येथे ड्यूटीवर तैनात कर्मचाऱ्यांची याप्रकरणात चौकशी होईल.
-आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.

(gold chain stole by unknown people in covid hospital amravati)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT