file photo
file photo 
विदर्भ

कोरोनाला पळविण्यासाठी ‘या‘ जिल्ह्यांत झाले जनता कर्फ्यूचे तंतोतंत पालन...इतर जिल्ह्यांतील नागरिकांनीही द्यावा प्रतिसाद

मुनेश्‍वर कुकडे

भंडारा/गोंदिया : गत आठवडाभरापासून शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, संक्रमण रोखण्यासाठी नगर परिषदेने शनिवारी (ता. ८) व रविवारी (ता. ९) जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानुसार, आज, शनिवारी पहिल्याच दिवशी शहरवासींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


देश, राज्य नव्हे, तर जिल्ह्यातही कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनस्तरावरून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्यात. मात्र, कोरोना विषाणूचा फैलाव थांबता थांबत नाही. दररोज कुठे ना कुठे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता तर, वाढत आहे, शिवाय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठवडाभरात शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली. तथापि, कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी येथील नगर परिषदेत काही दिवसांपूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नगर परिषद पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शहरात शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आवाहनदेखील करण्यात आले.

या आवाहनानुसार, आज शनिवारी पहिल्याच दिवशी शहरवासींनी कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. लहान- मोठी दुकानेही स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. सर्वत्र शुकशुकाट पसरलेला होता. औषधी दुकाने, दवाखाने यासह अन्य अत्यावश्‍यक सेवा सुरू होत्या. दरम्यान, शनिवारी शहरवासींनी कर्फ्यूला उत्स्फूर्त दिला तसाच प्रतिसाद रविवारीदेखील द्यावा, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले.

कोरोनाची साखळी तोडणार

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने शनिवारी (ता. ८) व रविवारी (ता. ९) शहरात जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला साद देत शहरवासींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोंदिया शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, लहान-मोठी दुकाने कडकडीत बंद होती. गोंदिया जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्णांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. दररोज कुठे ना कुठे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ही प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढविणारी बाब आहे.

अनलॉक सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या वाढत असल्याचे बोलले जाते. गोंदिया शहरातदेखील मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आगामी काळात नगर परिषद क्षेत्रात कोरोना विषाणूचा समूह संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दरम्यान, या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी किंबहुना त्याची साखळी तोडण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ६) नगर परिषदेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना

यावेळी शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत आढावा घेण्यात आला. मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी शहरातील वाढते प्रतिबंधित क्षेत्र, शहरी भागातील सर्व्हे याबाबतची माहिती दिली. त्यानंतर संक्रमण रोखण्यासाठी शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसे आवाहनदेखील करण्यात आले. या आवाहनाला साद देत शहरवासींनी आज, शनिवारी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


यांच्यावर आता पोलिसांची नजर

जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतरदेखील विनाकारण रस्तोरस्ती फिरणाऱ्या टवाळखोरांची काही कमी नव्हती. अशा टवाळखोरांना चाप बसविण्यासाठी चौकाचौकात पोलिस तैनात होते. दुचाकीने डबलसिट, विनामाक्‍स अन्‌ विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.

नागरिकांनो, प्रशासनाला सहकार्य करा
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर नगर परिषदेत व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, नगर परिषदेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती. बैठकीत दोन दिवसांचा कर्फ्यू लावण्याचे ठरले होते. आज, शनिवारी पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याचा आम्हाला आनंद आहे. रविवारीदेखील नागरिकांनी प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
- करणकुमार चव्हाण, मुख्याधिकारी


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT