संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

या जिल्ह्याने जिंकली कोरोनाची लढाई...नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : गणेशनगर येथील एक युवक 17 मार्चला थायलंड या देशातून पर्यटन करून गोंदियात पोहोचला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली. कोरोनाबाधित असल्याच्या शंकेने त्याला 25 मार्चला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. मात्र शुक्रवारी त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे तो कोरोनामुक्त झाल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले. त्यामुळे त्याला घरी जाण्यासाठी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

अहवाल आला निगेटिव्ह

25 मार्चला या युवकाला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. 26 मार्चला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तो कोरोना विषाणूबाधित असल्याचे सिद्ध झाले. कोरोनाविषयक शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे वैद्यकीय चमू त्याच्यावर उपचार करीत होती. त्यानंतर 8 एप्रिलला दुसऱ्यांदा त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. त्या नमुन्याचा अहवालही निगेटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यावेळी 9 एप्रिलला त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शुक्रवारी (ता. 11) त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागाने त्याला रुग्णालयातून सुटी दिली. अखेर त्या युवकाने कोरोनामुक्त होऊन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली.

समुपदेशन आणि प्रतिबंध

संबंधित युवकाने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुटी देण्यापूर्वी त्याचे व त्याच्या परिवारातील सदस्यांचे वैद्यकीय चमूने समुपदेशन केले. या युवकाला आणखी चौदा दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. आरोग्यविषयक काळजी त्याने व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना घ्यावी लागणार आहे. आरोग्यविषयक काही तक्रारी असल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबत अवगत करावे लागणार आहे. दररोज आपल्या प्रकृतीची माहिती त्याने स्वतः वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे.

डॉक्‍टरांची एक चमू घरी भेट देणार

दिवसातून अनेकदा हात पाण्याने स्वच्छ धुवावे लागणार आहे. त्या युवकाच्या कुटुंबाला तो राहत असलेले घर व परिसर स्वच्छ ठेवावा लागणार आहे. घरातील व्यक्तींनीसुद्धा वारंवार पाण्याने हात स्वच्छ धुवावे, अशा सूचना समुपदेशनातून त्यांना करण्यात आल्या. डॉक्‍टरांची एक चमू त्याच्या घरी भेट देऊन त्याची नियमित तपासणी करणार आहे. त्या युवकाने नियमित पौष्टिक आहाराचे सेवन करावे, असा सल्ला त्याला समुपदेशनातून देण्यात आला आहे.

गणेशनगर परिसर आणखी काही दिवस सील

युवक कोरोना विषाणूबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर तो राहत असलेल्या गणेशनगरचा परिसर यापूर्वीच येण्या-जाण्यास पोलिसांनी प्रतिबंधित केला होता. संबंधित युवक कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त जरी झाला असला, तरी 10 एप्रिलपासून पुढील 28 दिवस गणेशनगरचा परिसर नागरिकांना येण्या-जाण्यासाठी प्रतिबंधितच राहणार आहे. पोलिस बंदोबस्त 28 दिवस तेथे कायम राहणार आहे. या भागातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आतापर्यंत 111 नमुने निगेटिव्ह

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण 122 नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी 112 नमुन्यांचा चाचणी अहवाल शनिवारी (ता. 11) प्राप्त झाला. त्यामध्ये 111 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 1 नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला होता. जो एक युवक 26 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता, त्याचा शेवटचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याला रुग्णालयातून शुक्रवारी सुटी देण्यात आली आहे. 10 नमुन्यांचा चाचणी अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त व्हायचा आहे.

जिल्ह्यात विदेश प्रवास करून 251 व्यक्ती आल्यात. त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा 14 दिवसांचा वास्तव्याच्या ठिकाणी विलगीकरणात राहण्याचा कालावधी संपलेला आहे. जिल्ह्यातील शासकीय विलगीकरण केंद्रात 59 व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज येथे 49 आणि लहीटोला येथे 10 अशा एकूण 59 व्यक्तींचा समावेश आहे. 10 एप्रिल रोजी गोंदिया आयुर्वेदिक कॉलेजमधून 29 नागरिकांना उपचारानंतर सुटी देण्यात आली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT