Explosives seized from Soyagatoli forest in Gondia sakal
विदर्भ

गोंदिया : गडमाता पहाडी परिसरातून विस्फोटके जप्त

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी गडमाता पहाडी-बेवारटोला धरणाजवळील जंगलात पेरून ठेवलेले विस्फोटके गोंदिया पोलिसांनी जप्त केलीत. ही कारवाई रविवारी ( ता. ७) केली.

सालेकसा तालुक्यातील सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसा जंगल परिसरात घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरून ठेवले आहेत. अशी गुप्त माहिती नक्षल सेल गोंदिया यांना मिळाली.

या माहितीवरून जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेल गोंदिया, सी-६० गोंदिया, सी-६० सालेकसा येथील कमांडो पथक व बिडीडीएस पथक गोंदियाने गडमाता पहाडी- बेवारटोला धरणाच्या जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी पहाडी भागात संशयित वस्तू आढळून आल्याने श्वान पथक व बिडीडीएस पथकाने पहाणी केली. या पहाणीत जिलेटीन कांड्या, चाकू, गावठी बंदुकीच्या राउंड, मेडिसिन ठेवलेला प्लास्टिक डबा, पिस्टल अन्य साहित्य आढळून आले. पोलिसांनी हे साहित्य बाहेर काढून जप्त केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT