Gondia police arrested actor Vijay raaz  
विदर्भ

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विजय राजला गोंदियात अटक; सहकारी महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप  

अथर्व महांकाळ

गोंदिया: बॉलिवूडच्या कलाकारांवर आरोप प्रत्यारोप नेहमीच केले जातात. सुशांत सिंग राजपूतच्या मिस्ट्रीनंतर बॉलिवूडमध्ये आरोपांची मालिका सुरु झाली होती. त्याआधी 'मी टू' च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडच्या बड्या कलाकारांवर शोषणाचे आणि विनयभंगाचे आरोप केले होते. आता अजून एका अभिनेत्यावर गोंदिया जिल्ह्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सध्या 'शेरनी' या चित्रपटाचं चित्रीकरण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सुरु आहे. या चित्रीकरणासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम विदर्भात आली आहे. गोंदिया शहरातील हॉटेल गेट वेमध्ये या चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. 

याचदरम्यान काल रात्रीच्या सुमारास या चित्रपटाच्या स्टाफपैकीच असलेल्या एका महिलेचा विजय राज यांनी विनयभंग केला असा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. पीडित महिलेनं त्यांच्याविरुद्ध गोंदियातील रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. 

पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून घेत विजय राज यांना अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांना पोलिसांकडून कोर्टात नेण्यात आलं आहे. दुपारी 3 च्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. या घटनेची दिवसभर शहरासह जिल्ह्यात चर्चा होती. घटनेबाबत पुढील तपास पोलिस करत आहेत.      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT