Tadoba Tiger 
विदर्भ

खूषखबर! आता घरबसल्या करता येणार ताडोबाची सफारी 

मोहम्मद नाहीद सिद्दीकी

मोहर्ली (जि. चंद्रपूर) : लॉकडाउनमुळे जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य हंगाम आता वाया गेला आहे. मात्र, व्याघ्रप्रेमी व वन्यजीवप्रेमींची जंगल भ्रमंतीची क्षुधा शांत करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने एक नावीन्यपूर्ण पुढाकार घेतला आहे. आता रोज दुपारी 3 वाजता ताडोबातील ताज्या जंगल भ्रमंतीचा अर्ध्या तासाचा रेकॉर्डेड भाग दिलेल्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. हा देशातील पहिलाच प्रयोग आहे, हे विशेष. 

साधारणपणे जानेवारी महिन्यापासून सुरू होणारा चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचा हंगाम यंदा कोरोना सावटामुळे संकटात सापडला आहे. याची भरपाई होऊ शकत नसली तरी जगभरातील व्याघ्रप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींना ताडोबातील वाघोबांशी कनेक्‍ट करण्याच्या दृष्टीने ताडोबा व्यवस्थापनाने घरबसल्या ताडोबा दर्शनाची सोय केली आहे. 17 एप्रिलपासून या नव्या व्यवस्थेला प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी दिलेल्या www. mytadoba.org किंवा youtube वर tatr4klive या संकेतस्थळावर हजारो प्रेक्षकांनी ताडोबा भ्रमंतीचा आनंद घेतला. ताडोबा म्हणजे वन्यजीवांची श्रीमंती. मात्र, हंगामाच्या काळात ताडोबा बंद असल्याने व्याघ्रप्रेमी हिरमुसले आहेत. यावर व्यवस्थापनाने कल्पक उपाय केला आहे. लॉकडाउन जारी असेपर्यंत रोज दुपारी 3 वाजता ताडोबाची ही सफर घरबसल्या आपल्या दिवाणखान्यात बसून बघता येणार आहे. अशा पद्धतीने ऑनलाइन सफारी सुरू करणारा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. याची प्रेरणा दक्षिण आफ्रिकेच्या क्रुजर नॅशनल पार्क लाईव्ह स्ट्रीमिंग कार्यक्रमातून घेण्यात आली आहे. यापुढच्या काळातही पर्यटक आणि व्याघ्रप्रेमींचे ताडोबाशी असलेले कनेक्‍ट कायम रहावे, ही त्या मागची भावना आहे. भ्रमंती दरम्यान सहजपणे वाघोबाचे दर्शनदेखील घरबसल्या होणार आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे ताडोबा प्रकल्प सध्या बंद आहे. पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींची गैरसोय होऊ नये आणि त्यांना घरबसल्या ताडोबा दर्शन घडावे, यासाठी हा प्रयत्न केला गेला. याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा. 
एन. आर. प्रवीण, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT