राज्यपाल कोश्यारी
राज्यपाल कोश्यारी sakal
विदर्भ

विदर्भाच्या दौऱ्याला मातृतिर्थ पासून सुरुवात - राज्यपाल कोश्यारी

गजानन काळुसे

सिंदखेड राजा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील माँ जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन धन्य झालो असल्याची महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी सांगितले.तसेच मातृतिर्थच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

सिंदखेड राजा नगरीचा विकास करून या ठिकाणी जागतिक पर्यटक येतील व सिंदखेड राजा येथील अर्थकारण गतिमान होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट देण्यासाठी व वंदन करण्यासाठी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशयारी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे आले होते.सकाळी मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीमध्ये राज्यपाल यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी ऐतिहासिक मोती तलाव, जिजाऊ सृष्टी, व राजवाडा, जन्मस्थळाची पहाणी केली. त्यानंतर राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्याला भेट देऊन त्यांनी राजमाता माँ जिजाऊ आणि बालशिवाजी च्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले, त्यानंतर राजवाड्याची पाहणी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली.

राजवाड्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळवर येऊन माझे जीवन धन्य झाले ज्या आईने छत्रपती शिवाजी महाराज सारख्या देशाच्या परमभक्त, युगप्रवर्तक जन्म दिला त्यांच्यावर सर्व देश गर्व करतोय अशा मातेला माझं नमन मी केलयं माझं भाग्य आहे. या पुण्यभूमीचा विकास झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. या जन्मस्थळाला देश-विदेशातून लोक भेट देण्यासाठी पर्यटक आले पाहिजे असा आपला प्रयास असल्याची प्रतिक्रियाही महामहीम राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केली. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे आपल्या येथील प्रतिनिधी आहेत. ते देखील येथील सर्वांगीण विकासाकडे लक्ष देतील असे ते म्हणाले.

ऐतिहासिक मोती तलाव व लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्याची ऐतिहासिक माहिती राज्य पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालिका जया वाहने व वंशज शिवाजीराव राजे जाधव यांनी महामहीम राज्यपालांनी दिली.राज्यपालानी राजवाड्याची पहाणी केल्यानंतर महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्या हस्ते राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाडा मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद सावरिया जिल्हा परिषद मुख्याधिकारी भाग्यश्री विसपुते, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार सुनील सावंत, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्णा वेणीकर, राज्य पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालिका जया वहाणे, नायब तहसीलदार आस्मा मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, नगराध्यक्ष सतीश तायडे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, माजी आमदार विजयराज शिंदे, वंशज शिवाजीराव राजे जाधव, प्रसाद कुलकर्णी, कंत्राटदार वैजनाथ फड, विवेक जगताप, पुरातत्व विभागाचे ओमकेश सांगळे, राहुल सरकटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महामहिम राज्यपालांनी मराठीतून साधला संवाद

महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे आल्यानंतर त्यांनी उपस्थित असणाऱ्या सोबत मराठीतून संवाद साधला. माँ जिजाऊचे दर्शन झाल्यानंतर राजवाड्यावर असलेल्या मंदा खंडारे ह्या महिला गाईडने त्यांना राजवाडाच्या ऐतिहासिक वास्तु संदर्भामध्ये हिंदी भाषे मधून माहिती सांगण्यास सुरुवात केली, परंतु महामहिम राज्यपाल यांनी महिला गाईडला मराठीतून माहिती सांगण्यास सांगितले. राजवाड्याच्या संदर्भामध्ये महिला गाईडने संपूर्ण माहिती मराठी मधून सांगितल्यानंतर महामहीम राज्यपालांनी सुद्धा मराठी मध्ये बोलण्यास सुरुवात केली होती. राज्यपाल भगतसिंग कोशयारी हे मराठी मधून बोलत असल्याने यावेळी सर्वांना सुखद धक्का बसला.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली महामहिम राज्यपाल यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला. त्यांच्या या दौऱ्यासाठी १ जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक, २ उपविभागीय पोलिस अधिकारी, ५ पोलीस निरीक्षक, १२ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १३३ पोलीस कर्मचाऱ्यांचा राजवाडा परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद सावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार,पोलीस निरीक्षक केशव वाघ, पोलीस निरीक्षक जयवंत सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार निकाल

आजचे राशिभविष्य - 10 मे 2024

अग्रलेख : प्रचारासाठी दाहीदिशा...

Akshaya Tritiya 2024 : आज सर्वत्र अक्षय तृतीयेचा उत्साह, जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्व

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2024

SCROLL FOR NEXT