Tiger GPS Collar
Tiger GPS Collar Sakal
विदर्भ

Tiger GPS Collar : वाघिणीच्या गळ्यात पुन्हा बांधला जीपीएस कॉलर

सकाळ वृत्तसेवा

भंडारा - नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या नवीन वाघिणीचा सॅटेलाईट जीपीएस कॉलर अभयारण्यात मिळाला. यामुळे वन्यजीव विभागाच्या पथकांद्वारे तिचा युद्धस्तरावर शोध घेण्याची माेहीम राबविण्यात आली. यात आज सकाळी या एनटी-३ वाघिणीचा ठावठिकाणा शोधून तिच्या गळ्यात पूर्ववत जीपीएस कॉलर लावून तिला जंगलात सोडण्यात आले आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांचे संवर्धन व स्थानांतरण या उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एनटी-३ वाघीण ११ एप्रिलला सायंकाळी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे गाभा क्षेत्रातील नागझिरा अभयारण्याचे कक्ष क्रमांक ९५ मध्ये निसर्गमुक्त करण्यात आले होते.

त्यानंतर १२ एप्रिलला या मादी वाघिणीच्या जीपीएस कॉलरचे सिग्नल आणि व्हीएचएफ चमूला प्राप्त होणारे सिग्नल एकाच ठिकाणातून येत होते. त्यामुळे १३ एप्रिलला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील व्हीएचएफ चमू, क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून शोध मोहीम राबविण्यात आली.

यात एनटी-३ या वाघिणीचा सॅटेलाईट जीपीएस कॉलर चालू स्थितीमध्ये नागझिरा अभयारण्यातील कक्ष क्रमांक ९५ मध्ये जमिनीवर पडलेला आढळला. त्यानंतर वाघिणीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञाचे मार्गदर्शनाखाली व्याघ्र प्रकल्पातील व्हीएचएफ चमू व क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून शोधमोहीम राबविण्यात आली.

आज, सोमवारी (ता. १५) सकाळी नागझिरा अभयारण्यात एनटी-३ या वाघिणीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर सकाळी सुमारे साडेनऊ वाजता या वाघिणीला ट्राक्युलाइज करून पुन्हा सॅटेलाईट जी.पी.एस. कॉलर लावून त्याच ठिकाणी निसर्गमुक्त करण्यात आले.

ही कारवाई वनसंरक्षक (प्रादेशिक) श्रीमती. श्रीलक्ष्मी ए, उपवनसंरक्षक तथा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक प्रमोदकुमार पंचभाई, उपसंचालक पवन जेफ यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व त्याचे जलद कृती दल आणि भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून येथील सहाय्यक संशोधक यांचे सहकार्याने पार पाडण्यात आली.या मोहीमेमध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी, बायोलॉजीस्ट, जलद कृती दल, व्हीएचएफ सनियंत्रण चमू यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

निसर्गमुक्त केलेल्या वाघिणीला सॅटेलाईट जीपीएस कॉलर तसेच व्हीएचएफ अँटेनामार्फत क्षेत्रीय स्तरावर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील प्रशिक्षित चमूद्वारे वाघिणीच्या हालचालीवर सातही दिवस २४ तास सक्रियपणे संनियंत्रण सुरू आहे.

शेवट सुखद झाला

एनटी -३ या वाघिणीला नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आल्यावर दुसर्याच दिवशी तिच्या गळ्यातील कॉलर जंगलात पडलेले मिळाल्याने व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव विभागाच्या अधिकरी-कर्मचारी यांच्या मनात निरनिराळ्या अप्रिय घटनांचे काहूर माजले होते. त्यानंतर परिसराची तपासणी केली तेव्हा कोणत्याही घातपाताचे चिन्ह न दिसल्याने त्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला. दोन दिवसानंतर ही वाघिण मिळाली व तिच्या गळ्यात पुन्हा कॉलर लावल्याने या प्रकरणाचा शेवट सुखद झाला, असेच म्हणावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT