rice 
विदर्भ

शालेय पोषण आहारात आता मिळणार खिचडीऐवजी धान्य

सुधीर भारती

अमरावती : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरूच आहे. त्यामुळे सरकारने माध्यान्ह भोजन योजनेतील शालेय पोषण आहारही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात विद्यार्थ्यांना आहार शिजवून न देता शिधा स्वरूपात धान्य वाटप करण्यात येणार आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यातील साठ दिवसांसाठी पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा किलो व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नऊ किलो तांदूळ मिळणार आहेत. यासोबत खिचडी शिजवण्याच्या खर्चात धान्यादी मालाचे वाटप केले जाणार आहे.

राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सरकारच्यावतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात येते. कोरोनामुळे या उपक्रमात व्यत्यय आला असून मागील शैक्षणिक वर्षात शाळा संपण्यापूर्वीच कोरोनाची साथ आल्याने अडचण झाली. यामुळे माध्यान्ह भोजन योजनेतील तांदूळ व अन्य मालाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.

याच पद्धतीने चालू शैक्षणिक वर्षात शिधा वाटप सुरू ठेवण्यात येत असून जून ते ऑगस्ट या तीन महिन्यातील साठ दिवसांसाठी तांदूळ व खिचडी शिजवण्याच्या खर्चातून अन्न धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी नऊ किलो तांदळाचे वाटप होणार आहे.

साठ दिवसाच्या काळात खिचडी शिजवून देण्यासाठी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रत्येकी २६८ रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ४०२ रुपये खर्च मजूर आहे. या खर्चातून धान्यादी माल देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात मुगडाळ, मसुरडाळ, तूरडाळ, हरभरा, चवळी, मटकी व अख्खे मुग यापैकी धान्यादी वस्तूची निवड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. यात मुगडाळ, मसुरडाळ व तूरडाळ यापैकी एक डाळ तर हरभरा, चवळी, मटकी व अख्खे मुग यापैकी एक कडधान्य देण्यात येणार आहे.

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

या धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी सरकारने पुरवठादाराची नियुक्ती केली असून त्याच्याशी झालेला करार जिल्हा परिषदांना कळविण्यात आला आहे. त्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापकांनी तांदूळ तसेच धान्यादी वस्तूची मागणी पुरवठादाराकडे करण्याचे आदेश संचालकांनी दिले आहेत. शाळेच्या पातळीवरच तांदूळ व धान्याची मालाचे वजन करून माल ताब्यात घ्यावा तसेच मालाचे वाटप विद्यार्थी किंवा पालकांना शाळेत बोलावून करावे असेही आदेशात म्हटले आहे.
संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

SCROLL FOR NEXT