gram panchayat elections held first time in Ex CM Vasantrao Naiks Villages in Yavatmal  
विदर्भ

माजी मुख्यमंत्र्यांच्या गावात प्रथमच ग्राम पंचायतीची निवडणूक; आजवर बिनविरोध ठरत होते सरपंच  

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आजतागायत बिनविरोध राहिलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या गहुली गावात मात्र, प्रथमच निवडणूक होत आहे. एकूण 676 ग्रामपंचायत सदस्यांसाठी येत्या 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार असून, 945 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

नामांकनपत्र परत घेतल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुसद तालुक्‍यातील 105 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी बान्शी, पिंपळखुटा, मोहा ईजारा, मांडवा, म्हैसमाळ, गौळ मांजरी व दुधागिरी या सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

तालुक्‍यातील गहुली ग्रामपंचायत ही आतापर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा जपत आलेली आहे. मात्र, यंदा या परंपरेत खंड पडला आहे. या ग्रामपंचायतीत सातपैकी सहा जागा बिनविरोध झाल्यात. मात्र, एका जागेसाठी अशोक मोनासिंग चव्हाण व युवराज नरसिंग राठोड यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक व भाजपचे आमदार नीलय नाईक यांनी बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी प्रयत्न करूनही दोन्ही उमेदवारांनी दंड थोपटल्याने गहुलीत प्रथमच एका जागेसाठी निवडणूक होत आहे.

पुसद तालुक्‍यात आता 98 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी दोन हजार 402 उमेदवारांनी भरलेले अर्ज वैध ठरले. त्यापैकी 162 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता प्रत्यक्ष मतदान 676 जागांसाठी होत असून, एकूण उमेदवार 945 रिंगणात आहेत. एकूण 348 प्रभागांमध्ये लढती होत आहेत. उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले असून, कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT