digdoh grampanchayat
digdoh grampanchayat 
विदर्भ

ग्रामपंचायतींना पेलवेना भार "आबादी'चा !

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : दिवसेंदिवस अवाढव्य वाढलेली लोकसंख्या, गावांचे होत असलेले शहरीकरण, विकासकामांचा अभाव, पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष या सर्व समस्यांतून ग्रामपंचायतीचे रूपांतरण नगर परिषद किंवा नगरपंचायतीत व्हावे, या मागणीसाठी वाढत असलेला जोर लक्षात घेता स्थानिक पातळीवर राजकारण यात अडसर ठरत आहे. त्यापैकी काही ग्रामपंचायतींना लोकसंख्येचा भार आता पेलवेनासा झाला आहे. जिल्ह्यात काटोल तालुक्‍यातील कोंढाळी, हिंगणा तालुक्‍यातील डिगडोह, टाकळघाट, कुही तालुक्‍यात मांढळ, सावनेर तालुक्‍यात खापरखेडा, पारशिवनी तालुक्‍यातील कांद्री, रामटेक तालुक्‍यातील मनसर, उमरेड तालुक्‍यातील बेला आदी ग्रामपंचायतींना नगरपंचायत किंवा नगर परिषदेचा दर्जा मिळावा ही मागणी वारंवार होत असूनही नागरिकांना समस्यांशी सामना करावा लागत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत अवाढव्य फुगलेल्या ग्रामपंचायतींचा दर्जा वाढवून नगरपरिषदेची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.

नगरपंचायत, नगर परिषदेचे भिजत घोंगडे
हिंगणा : नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा एमआयडीसीचा डिगडोह ग्रामपंचायतीअंतर्गत परिसर येतो. औद्योगिक विस्तारामुळे सद्यःस्थितीत 600 कंपन्यांचा भार आहे. लोकसंख्या 38 हजारांच्या वर पोहोचली आहे. औद्योगिक नगरी डिगडोहला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, असे पत्र शासनाला पाठवले आहे. ग्रामपंचायत असल्यामुळे मूलभूत सुविधांसाठी निधी तोकडा पडत असल्याची ओरड सुरू आहे. यामुळे विस्तारित ग्रामपंचायतीच्या विकासाला खीळ बसत आहे.नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्राला लागूनच डिगडोह ग्रामपंचायत आहे. हिंगणा एमआयडीसी डिगडोह ग्रामपंचायत अंतर्गत येते. या एमआयडीसीत पूर्वी जवळपास 1300 कंपन्या कार्यरत होत्या. सद्यःस्थितीत ग्रामपंचायत क्षेत्रात 600 कंपन्या कार्यरत आहेत. औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण भागही आता शहरी भागासारखा विस्तारित झालेला आहे. ग्रामपंचायतीत 17 ग्रामपंचायत सदस्य आहेत. वार्षिक महसुली उत्पन्न दोन कोटींच्या घरात आहे. डिगडोहमध्ये वस्त्या झपाट्याने वाढल्या. उद्योगांमध्ये कामासाठी कामगार मोठ्‌या प्रमाणात वास्तव्याला आले. राज्य राखीव पोलिस दलाचा कॅम्पसुद्धा आहे.

क्‍लिक करा- कुठे आहेत नोक-या? मिहानमध्ये दुष्काळ

टाकळघाट नगरपंचायत का नाही?
हिंगणा तालुक्‍यातील टाकळघाट ग्रामपंचायतमध्येही औद्योगिक परिसर मोठ्‌या प्रमाणात आहे. जवळपास दोनशे उद्योग या ग्रामपंचायती अंतर्गत आहेत. लोकसंख्या 17 हजारांच्या घरात आहे. वार्षिक महसुली उत्पन्न एक कोटीच्या घरात आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत नगरपंचायतीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. यानंतर मात्र ग्रामसभेत नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, या ठरावाला सर्वांनी नामंजुरी दिली. यामुळे नगरपंचायतचा प्रस्तावच पाठवण्यात आलेला नाही, हे वास्तव आहे.


व्यापारनगरी मांढळला नगरपंचायतीची आस
कुही ः तालुक्‍यातील सर्वांत मोठी व व्यापारनगरी म्हणून ओळख असलेली मांढळ ग्रामपंचायत आता नगरपंचायत झाल्याशिवाय विकासाला गती मिळणार नाही. त्यामुळे शक्‍य तितक्‍या लवकर नगरपंचायत व्हावी, अशी जोरदार मागणी नेत्यांसह जनतेतून होत आहे. कुही यापूर्वी ग्रामपंचायतच होती. मात्र नगरपंचायत झाल्याबरोबर विकासाला गती मिळाली. निधीत वाढ झाली. राजकीय हस्तक्षेप कमी झाला. त्यामुळे सर्व विकासकामे योग्य पध्दतीने होत आहेत.मात्र मांढळ ग्रामपंचायतचा विचार केला तर अलीकडे येथे विकासापेक्षा राजकीय हस्तक्षेपामुळे भांडणेच जास्त होताना दिसतात. त्यामुळे विकास जणू थांबल्यासारखा झाला. येथे वर्षभरात कोणत्याच सभेत व्यवस्थित सर्व सदस्यांनी एकत्र विचारविनिमय करुन विकासकामांवर चर्चा केली नसल्यामुळे जनता त्रस्त आहे.

चिंचोली (खापरखेडा) नगरपंचायत कधी होणार?
खापरखेडा : परिसर हा शासनदरबारी दप्तरात चिचोली नावाने प्रख्यात असून शासनाची सर्व कामे चिचोलीच्याच नावाने होत असतात. चिचोली (खापरखेडा) परिसराची लोकसंख्या लाखोंच्या घरात असून येथे वीजनिर्मिती केंद्र, कोळसा खाणी, छोटे-मोठे कारखाने व विविध प्रकारचे उद्योगधंदे असल्याने लोकसंख्येत बरीच वाढ होत आहे. त्यामुळे चिचोली खापरखेड्याला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून सतत पाठपुरावे शासनाकडे करीत असतानाही अद्यापही नगरपंचायतीचा दर्जा मिळालेला नाही.आतातरी चिचोली खापरखेडा नगरपंचायत कधी होणार? असे ग्रामस्थ विचारू लागले आहे.परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आणि गावाचा विस्तारही मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामपंचायतला मिळणारा निधी, हा नेहमी अपुरा पडत असल्यामुळे गावाचा विकास पूर्णपणे शक्‍य होणे अपेक्षित नसल्यामुळे विकासाच्या बाबतीत मागे पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेची उमेदवारी

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT