tax 
विदर्भ

Video : असंवेदनशीलतेचा कळस! दिव्यांगांच्या निधीतून ग्रामपंचायत करतेय घर कराची वसुली

निलेश झाडे

धाबा (जि. चंद्रपूर) : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देश टाळेबंद झाला. टाळेबंदीत बँकेचे इएमआय,विद्यूत देयकाची वसूली न करण्याचा निर्णय सरकारने घेतला. जनधनच्या खात्यात पाचशे रुपयाची मदत सरकारने जमा केली. सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सरकार हात पुढे करीत असतांनाच धाबा ग्रामपंचायतीने मात्र असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या निधीतून चक्क घर कराची वसूली ग्रामपंचायतीने केली. या संतापजनक प्रकारावर सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामपंचायत धाबा अंतर्गत एकूण 24 दिव्यांगाची नोंद आहे. या  ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नातील पाच टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या अपंग निधीतून दिव्यांगाना दिली  जाते. मागील सत्रात ग्रामपंचायतीने दिव्यांगाना अनुदानाचे वाटप केले नव्हते. त्यामुळे दोन वर्षाचे अनुदान ग्रामपंचायतीने दिव्यांगाना दिले. एका दिव्यांगाला दोन हजार रुपयाचे अनुदान द्यायचे होते. मात्र दिव्यांगांच्या हातात केवळ हजार रुपये ठेवण्यात आले तर उर्वरित हजार रुपयातून घर टक्स कपात करण्यात आली. या प्रकाराने दिव्यांगाचे आई-वडील चांगलेच भडकले मात्र त्यांचे काही एक न ऐकता ग्रामपंचायतीने घर टक्स कपात केली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लाकडाऊन सुरू आहे. राज्याच्या जिल्हाच्या सीमा सिल करण्यात आल्या.धावणारे जग थांबले. उद्योग बंद झालेत.

नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळले. कामगार,मजूरांच्या हातांना रोजगार नसल्याने खाण्यापिण्याचेही वांधे झाले होते. अशा बिकट स्थितीत सरकारने मदतीचा हात पुढे केला. बँकेचे ईएमआय,विद्यूत देयकाची वसूली न करण्याचा आदेश काढला. गरिबांना मोफत अन्नधान्य दिले. दुसरीकडे दीड महिना गरिब दिव्यांगांच्या निधीतून धाबा ग्रामपंचायतीने घर टॕक्सची वसूली केली.या प्रकारावर ग्रामपंचायतीच्या संवेदना बोथट झाल्याची तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दिव्यांगाना अपंग निधीतून दोन हजाराचे अनुदान देण्यात आले. त्यापैकी काहीं दिव्यांगांच्या अनुदान रकमेतून घर कर कपात करण्यात आली. त्यांच्या सहमतीनेच कराची रक्कम वसूल करण्यात आली.
कीर्तीमंत मंगर,ग्रामविकास अधिकारी,धाबा
असंवेदनशीलतेचा कळस
टाळेबंदीत गरीब,कामगार,मजूरांना शासन,प्रशासन मदतीचा हात समोर करीत असतांना ग्रामपंचायतीने दिव्यांगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीची वसूली केली आहे. हा प्रकार संतापजनक आहे. धाबा ग्रामपंचायतेने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे.
नामदेव सांगडे,माजी सरपंच,धाबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT