green valley tourism in worst condition in sihora of bhandara  
विदर्भ

'एमटीडीसी'ला हस्तांतरित करूनही ग्रीनव्हॅली पर्यटनस्थळाची दुरवस्थाच

सहादेव बोरकर

सिहोरा (भंडारा): महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित असलेला जिल्ह्यातील एकमेव ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ गेल्या आठ वर्षांपासून उपेक्षित आहे. विकासाच्या बाता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापर्यंतच मर्यादित ठेवण्यात येत आहेत. यामुळे या उपेक्षित पर्यटनस्थळाला न्याय मिळाला नाही. मुंबई दरबारातून विकासाचा निधी व हालचालींना गती देण्यात आली नाही. यामुळे परिसरातील  नागरिकांत नाराजीचा सूर आहे. 

सन 2000 मध्ये राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यातील सिहोरा परिसरात नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपुडा पर्वत रांगातील ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाला मंजुरी दिली होती. यानंतर पर्यटनस्थळात विकास करण्यासाठी कंत्राटदाराला लीजवर देण्यात आले. कंत्राटदारामार्फत शासनाला महसूल देण्यात येत होता. गेली 10 वर्ष राज्याचे कानाकोपऱ्यात या पर्यटन स्थळाचे प्रचार आणि प्रसार करण्यात आला. चांगली वाटचाल सुरू असताना पर्यटनस्थळ ऑगस्ट 2012 मध्ये बंद करण्यात आले. या कालावधीनंतर पर्यटनस्थळाचे विकास कार्यासाठी गतीने चाके फिरली नाहीत. कधी इको टुरिजमची माहिती पेरण्यात आली. परंतु, ते उगवलेच नाही. पर्यटनस्थळ नामशेष होत असताना हिवाळी अधिवेशनात फक्त चर्चा झाली. 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळला ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ हस्तांतरित करण्यात येत असल्याची घोषणा युती शासनाच्या काळात करण्यात आली. पर्यटन विकासाचे नावावर साधी एक वीटसुद्धा पोहोचली नाही. तत्कालीन आमदार चरण वाघमारे यांनी पर्यटनस्थळात असणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. झुडपी जंगल आणि वन विभागाची आडकाठी त्यांनी दूर केली. पर्यटनस्थळ विकासाला मोकळा श्वास दिला. पर्यटनस्थळात 1 कोटी 85 लाख रुपये खर्चाचे विश्रामगृह खेचून आणले. पर्यटक निवास, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, या अन्य सुविधा या विश्रामगृहात राहणार आहे. त्यानंतर मात्र विकास पुढे ढकलण्यात आला नाही. जलाशय परिसरात विकास शून्य आहे. टाकीत काहीच नाही. पर्यटनस्थळात रोल मॉडेल देण्याची क्षमता चांदपूर गावात आहे. गावात वैभव असून या वैभवात ऋषीमुनी आश्रम, प्रसिद्ध जागृत हनुमान देवस्थान, चांदशाह वली दर्गाह, या गावाची संस्कृती, लंगडा मारुती, अशी अनेक भुरळ घालणारी आकर्षक केंद्र आहेत. विशाल जलाशय आहे. जलतरण स्पर्धा घेतली जाऊ शकतो. या दिशेने प्रयत्न करण्यात आले नाही.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ च्या वतीने या पर्यटनस्थळात अद्यापपर्यंत गतिशील कामांना सुरुवात करण्यात आली नाही. महामंडळ नावापुरतेच असल्याचा अनुभव येत आहे. येत्या पुढील दोन महिन्यांत नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार आहे, घोषणांचा पेटारा उघडला जाईल. परंतु, अधिवेशन गुंडाळल्यानंतर भोपळा दिला जाईल. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने या पर्यटनस्थळाला न्याय मिळाले नाही. मुंबई दरबारात दबाव निर्माण केल्याशिवाय न्याय मिळत नाही. परंतु, तसे प्रयत्न होत नाही. जिल्ह्यात बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा पर्यटनस्थळ आहे. परंतु, रोजगार देणारी मानसिकता नाही. यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष आहे. 

परिसरात रोजगार खुंटला -
या परिसरात शेतीवर अर्थव्यवस्था आहे. पर्यटनस्थळाने अर्थव्यवस्थेला मजबुतीचा जोड दिला आहे. पर्यटनस्थळात 100 हून अधिक बेरोजगार तरुण दिवसरात्र कामाला होते. पर्यटनस्थळाने त्यांना रोजगार दिले होते. पर्यटनस्थळ बंद होताच पुन्हा तरुण बेरोजगार झाले. शासनाचे काही कमी जास्त झाले नाही. परंतु, बेरोजगार व त्यांचे कुटुंब हलाकीचे जीवन जगण्यापर्यंत आले. पर्यटनस्थळामुळे परिसरातील सुचारु अर्थव्यवस्थेला बळ मिळाले होते. आता लचके तुटले आहेत. या परिसरात रोजगार, उद्योग नाहीत. रोजगाराची साधने आहेत, तर विकास कार्याला चालना मिळत नाही. यामुळे परिसरातील बेरोजगार तरुण उपेक्षित आहेत. 

ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ पुन्हा सुरू करण्यासाठी भरीव प्रयत्न करण्यात आले नाही. माजी आमदार चरण वाघमारे यांनी विश्रामगृह मंजूर करून उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यटनस्थळ विकासासाठी अधिवेशन दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले जाईल.
- किशोर रहांगडाले युवा नेते भाजप बिनाखी 

ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ सुरू असताना अनेक बेरोजगार तरुण कामाला होते. ते बंद होताच ते पुन्हा बेरोजगार झाले. पर्यटनस्थळ सुरू झाले पाहिजे, बेरोजगार तरुणाचे शिष्टमंडळ विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार आहेत.
- सतीश पटले, माजी व्यवस्थापक, ग्रीनव्हॅली पर्यटनस्थळ चांदपूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''मुंबईला चाललो म्हणून निघाले अन् रात्रीतूनच दिल्लीला गेले'', धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीची इनसाईड स्टोरी

Viral Video Mother Dolphin : मन हेलावणारी घटना! मृत डॉल्फिनच्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईची धडपड, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

Lucky Rashifal 2026: कन्या राशीसह 'या'3 राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल नवे वर्ष, सर्व इच्छा पूर्ण होतील

IPL 2026 लिलावात अनसोल्ड राहिला, पण पठ्ठ्याने धीर नाही गमावला! देशासाठी नाबाद १७८ धावांची खेळी, २५ चौकारांचा पाऊस

SCROLL FOR NEXT