Grey squirrel set fire to the pile of weeds in Chandrapur
Grey squirrel set fire to the pile of weeds in Chandrapur 
विदर्भ

खारूताईने लावली तणसाच्या ढिगाऱ्याला आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

चिमूर (जि. चंद्रपूर) : नगर परिषद क्षेत्रातील ठक्कर वॉर्डातील तणीस कॉलनी सोनेगाव (सिरास) मार्गावर रामेश्‍वर बापूनाथ भलमे यांच्या शेतात तणसांचे ढिगारे आहे. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ढिगाऱ्याच्या बाजूला असलेल्या वीजखांबावर खारूताई चढली. त्याचवेळी खांबावरील वीजतारांत शॉर्टसर्किट होऊन गवताने पेट घेतला.

चिमूर- सोनेगाव (सिरास) मार्गावर रामेश्‍वर भलमे यांचे शेत आहे. तणीसाचे ढिगाऱ्याला आग लागल्याच्या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना झाल्याबरोबर त्यांनी तिकडे धाव घेतली. मिळेल तसे आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती नगर परिषदेला देण्यात आली. अग्नीशमन दलाकडून आग विझविण्याकरिता प्रयत्न करण्यात आले. मात्र, हवेमुळे पुन्हा आगीने भडका घेतला.

याची माहिती तहसीलदार डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांना देण्यात आली. तहसीलदारांनी नगर परिषदेच्या अधीक्षकांना सूचना देऊन पुन्हा अग्निशमन दलाच्या जादा गाड्या बोलविण्याचे निर्देश दिले. आग विझविण्यासाठी रात्रीपर्यंत पाच तास प्रयत्न करावे लागले.

प्रत्यक्षदर्शिनुसार खारूताई खांबावर चढून तारेवरून जात असताना शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे स्पार्किंग होऊन त्याच्या तिडक्‍या तणसाच्या ढिगाऱ्यावर पडल्याने आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

गुराच्या गोठ्याला भीषण आग लागली. त्यात शेतकऱ्यांची लाखो रुपयांची तूर, शेत पिकाला पाणी करण्याचे शंभर पाईप जळून खाक झाले. आगीने मोठी आर्थिक हानी झाली. लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT