विदर्भ

हृदयद्रावक! गेला नवरीला आणायला पण घरी आला मृतदेह! लग्नसोहळा आटोपताच नवरदेवाचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : मंगलाष्टके झाली. आपल्या जीवनसाथीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि पुष्पहार घालून त्याने तिला स्वतःची अर्धांगिनी बनविले. वऱ्हाड्यांनी "नांदा सौख्यभरे" असा वधूवरांना आशीर्वादही दिला. पण काही वेळातच होत्याचे नव्हते झाले. वराची प्रकृती अचानक बिघडली. लग्नस्थळी एकच धावपळ सुरू झाली. नवरदेवाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु वाटेतच नवरदेवाचा मृत्यू झाला आणि लग्नमंडपात शोककळा पसरली.

लग्नासाठी आलेल्या मंडळींना अंत्यसंस्कारासाठी जाण्याची दुदैवी वेळ आली. ही हृदयद्रावक घटना 15 एप्रिल रोजी ब्रह्मपुरी तालुक्‍यातील आवळगाव येथे घडली.

सिंदेवाही तालुक्‍यातील गडबोरी(वासेरा) येथील नाजूक अभिमन्यू पोहनकर यांचे ब्रम्हपुरी तालुक्‍यातील आवळगाव येथील दीपाली मेश्राम हिच्याशी लग्न जुळले. सध्या राज्यात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे शासकीय निर्देशांचे पालन करून लग्नसोहळा पार पाडायचा असे ठरले. 15 एप्रिल चा दिवस उजाडला. वधू मंडपी लग्नाची लगबग सुरू झाली. वधूवरांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक आनंदी होते. वर मोजक्‍या वऱ्हाडासह वधूच्या मंडपी पोचले. लग्न पार पडले.

नवरदेवाने नवरीला मंगळसुत्र घालून अर्धांगिनी म्हणून स्वीकार केले. लग्नसोहळा पार पडला. आता वधूला तिच्या सासरी सार करण्याची वेळ झाली. वर-वधू चारचाकी गाडीत बसले आणि अचानक वरांची प्रकृती खराब झाली. उपचारासाठी वराला ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. परंतु काळाने घाला घातला आणि वराचा मृत्यू झाला. सुखी संसाराचे स्वप्न सुरू होण्याआधीच भंगले.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT