टाकळघाट ः जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांनी प्रतीकात्मक काढलेली अंत्ययात्रा.
टाकळघाट ः जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांनी प्रतीकात्मक काढलेली अंत्ययात्रा.  
विदर्भ

जुन्या पेन्शनसाठी गुरुजी उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

टाकळघाट (जि.नागपूर) ः जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक आमदारांसह शेकडो शिक्षक शनिवारी रस्त्यावर उतरले. नवीन अंशदान पेन्शन योजना लागू केल्याने त्यांनी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदविला. त्यासाठी सेवाग्राम ते नागपूर अशी पायदळ दिंडी सेवाग्राम येथून सुरू झाली. शनिवारी सायंकाळी बुटीबोरी येथे पोहोचून डोंगरगावच्या विजय कॉलेजमध्ये मुक्काम करण्यात आला.

अधिकाऱ्यांनो माहिती सादर करा
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील चार विभाग व वीस जिल्ह्याचे नेतृत्व करणारे अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. श्रीकांत देशपाडे, पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय सावंत, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बळीराम पाटील, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली सेवाग्राम वर्धा ते विधानभवन नागपूर जवळपास 85 ते 90 किलोमीटर पायदळ जात आहे. त्यांनी काढलेल्या पायदळ दिंडीचा धसका घेत शासनाने राज्यातील शाळांमधील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत माहिती सादर करा, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उपसंचालक ज्योती शिंदे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी संगितले. सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व तुकड्यांवर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये रोष दिसत असून प्रशासनाने आमच्या मागणीकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT