Gutkha smuggling in Yavatmal exposed 
विदर्भ

ट्रकमध्ये होते 160 पोत्यांचे सुरक्षाकवच; कारवाईसाठी गेलेले पोलिस झाले अवाक

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीसह निर्मितीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, गाव, शहर व खेड्यात प्रत्येक ठिकाणी गुटखा सहज उपलब्ध होताना दिसून येतो. आरोग्यास हानीकारक गुटखा कमी किमतीत आणून चढ्याभावात विक्री केली जाते. कमी वेळात जास्त कमाई होत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी गुटखा तस्करीच्या व्यवसायाची निवड केली आहे. यासाठी नवनवीन शक्‍कल लढविली जात आहे. अशाच एका तस्करीचा पर्दाफाश शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, फुलसावंगी, आर्णी, नेर, दारव्हा हे गुटखा तस्करांचे केंद्रबिंदू ठरत आहेत. नागपूर-तुळजापूर मार्गावरून शुक्रवारी (ता. 12) दहा चाकी ट्रममधून गुटखातस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने पांढरकवडा मार्गावरील पुलाजवळ सापळा रचला. ट्रकची पाहणी केली असता कुणालाही संशय येणार नाही अशा पद्घतीने सभोवताल खराब तांदळाच्या तब्बल 160 पोत्यांचे सुरक्षाकवच सुगंधित तंबाखू व पानमसाला यांना देण्यात आले होते.

पोलिसांना मिळालेल्या टिपची खात्री असल्याने त्यांनी पोते उघडून पाहणी केली असता आतमध्ये गुटख्याचे घबाडच आढळून आले. 32 लाख 64 हजार रुपये किमतीचा पानमसाला, सुगंधित तंबाखू व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 52 लाख 64 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यावेळी सनवर खान सलाउद्दीन खान (वय 24, रा. बिदर), अब्दुल मुक्तार समी (वय 20) यांना ताब्यात घेण्यात आले. हा ट्रक कनार्टकमधून पांढरकवडा, यवतमाळमार्गे आला. हा साठा कारंजा येथील जाफर अली याच्याकडे जात होता, अशी कबुली चालकाने दिली. तिघांविरुद्ध अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अत्यावश्‍यक सेवा पास
तीन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. जून महिन्यात काहीप्रमाणात शिथिलता देण्यात आली. जीवनावश्‍यक वस्तूंची ने-आण करण्यास परवानगी आहे. त्यासाठी पास देण्यात येते. गुटखा वाहतूक करीत असताना संशय येणार नाही. त्यासाठी तांदूळ वाहतुकीचा बनाव करून पासदेखील घेण्यात आली होती.

बिदरमध्ये निर्मिती
राज्यात गुटखाविक्रीला बंदी असली तरी लगतच्या कनार्टकात निर्मिती केली जात आहे. जानेवारी महिन्यात बिदर येथून आलेला गुटखासाठा ग्रामीण पोलिसांनी रूई-मंगरूळ आडमार्गावर पकडला होता. त्यावेळीदेखील हा गुटखा कारंजा येथेच जात होता, अशी माहिती आहे. मात्र, पोलिसांचे हात म्होरक्‍यापर्यंत पोहोचले नव्हते. आता कारंजा येथील तस्कराचे नावच रेकॉर्डवर आल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT