File photo 
विदर्भ

उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस

सकाळ वृत्तसेवा


नागपूर : उपराजधानीत चोरटे सक्रिय झाले आहेत. सहा ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. चोरट्यांनी हुडकेश्‍वर हद्दीत एकाच भागात एका रात्रीतून तीन तर कोराडीत दोन घरांमधून मुद्देमाल लांबविला.
हुडकेश्‍वर हद्दीत बुधवारी रात्री 12 ते गुरुवारी सकाळी 9 दरम्यान घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या. नरसाळा, राधानगर येथील रहिवासी खुशाल बाहे (44) गणपतीच्या जेवणासाठी पत्नीसह स्वावलंबीनगर येथे गेले होते. चोरट्याने दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व अकराशे रुपये रोख असा 38 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांच्या घरासमोरच अंबिकानगर, नरसाळा येथील रहिवासी नरेंद्र गिरडे हेसुद्धा घराबाहेर होते. चोरट्याने दाराचे कुलूप तोडून कपाटातून सोन्याचांदीचे दागिने व 30 हजार रुपये रोख असा 38 हजर 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच गिरडे यांच्या घरामागे राहणारे श्रीकृष्ण खेडकर (38) यांच्या घराच्या दाराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. लोखंडी आलमारीतील दागिने व 10 हजार रुपये रोख चोरून नेले. एकाच चोरट्याने तिन्ही घरफोड्या केल्याचा कयास आहे.
अंबिकानगर, नरेंद्रनगर येथील रहिवासी नंदा रघुवंशी (60) गुरुवारी दुपारी सहकुटुंब गणेश विसर्जनासाठी सोनेगाव तलाव परिसरात गेल्या होत्या. चोरट्याने लोखंडी गेटचे कुलूप तोडले तसेच मुख्य दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने व अन्य साहित्य असा एकूण 2.85 लाखांचा मुद्देमाला चोरून नेला. कोराडीतील हिरोज हाउसिंग सोसायटी, ओमनगर येथील रहिवासी शम्मी चौबे (35) कामानिमित्त मूळ गावी गेले होते. चोरट्याने दाराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी आलमारीचे लॉक तोडून 35 हजार रुपये रोख आणि कपाटातील इलेक्‍ट्रिकचे साहित्य असा 1 लाख 11 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. कोराडीतीलच प्रीती सोसायटी येथील रहिवासी सुरेश चिटोले (56) गणपतीच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. चोरट्याने दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटाच्या लॉकरमधील दागिने व 1 लाख रुपये रोख असा 3.30 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी ही घटना उघडकीस आली. सर्व प्रकरणात संबंधित पोलिसांनी घरफोडीचे गुन्हे दाखल केले आहेत.दोन मोबाईल चोरटे जेरबंद
पाचपावली : पाचपावली
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन मोबाईल चोरट्यांना जेरबंद करीत चोरीचे 19 मोबाईल जप्त केले. रूपेश क्षीरसागर (20) व राजेश मेश्राम (18, दोघेही रा. पवनसूतनगर, हुडकेश्‍वर रोड) अशी चोरट्यांची नावे आहेत. आशीनगर खान कॉम्प्लेक्‍स, कामठी रोड रहिवासी सोहेल कुरेशी (22) नातेवाइकांसोबत चित्रपट बघण्यासाठी जसवंत तुली मॉल येथे गेला होता. चित्रपटाला वेळ असल्याने सोहेल मोबाईल दुचाकीवर ठेवून जवळच्या पानठेल्यावर पाण्याची बॉटल घेण्यासाठी गेला. तेवढ्यातच मोबाईल चोरी गेला. याप्रकरणी नऊ सप्टेंबरला पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासांत दोन तरुण वैशालीनगर घाट परिसरात स्वस्त दरात मोबाईल विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिस वेशांतर करून परिसरात गेले आणि रूपेश व राजेशला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. त्यांच्याजवळ चार मोबाईल सापडले. पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली. न्यायालयातून पोलिस कोठडी मिळविल्यानंतर सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून 2.70 लाखांचे 19 मोबाईल जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar News: 'महाबळेश्वरमध्ये मध्यरात्री टपरीवर कारवाई'; आचारसंहितेचा फायदा घेत व्यावसायिकाचा प्रताप; प्रशासनाने डाव हाणून पाडला

Beed Heavy Rain: आता तरी आम्हाला मदत मिळणार का? शेतकऱ्यांचा केंद्रीय पथकाला सवाल, येवलवाडी परिसरात केली पाहणी

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांना आचारसंहितेचा अडसर नाही! त्र्यंबकेश्वरमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण; आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

Pune News: 'काचळवाडीला जेरबंद बिबट्याचा सुटकेसाठी दोन बिबट्यांकडून प्रयत्न'; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Girish Mahajan : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण : "जागेचा मोबदला मिळेल," गिरीश महाजन यांचे आश्वासन; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

SCROLL FOR NEXT