hang 
विदर्भ

घरी हळदीचा कार्यक्रम सुरू होता; अन्‌ अचानक आला एक फोन...

सकाळ वृत्तसेवा

तिवसा (जि. अमरावती) : तालुक्‍यातील कुऱ्हा गावात सोमवारी (ता. 24) दुपारी एक वाजताच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. गावातील एका शेतकरी पित्याने उद्या, मंगळवारी एका मुलाचे तर येत्या गुरुवारी (ता. 27) दुसऱ्या मुलाचे लग्न असताना अचानक शेतशिवारातील एका झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. 

कुऱ्हा येथील रहिवासी असलेले भारत महावीर शिंगाडे (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भारतशिंगाडे यांच्याकडे सामूहिक आठ एकर शेती आहे. शिंगाडे यांचा मोठा मुलगा संतोष भारत शिंगाडे याचा उद्या, मंगळवारी, तर दुसरा मुलगा आकाश भारत शिंगाडे याचा येत्या गुरुवारी (ता. 27) विवाह होता. मंगळवारी लग्न असल्याने मोठा मुलगा संतोष याला हळद लावण्याचा कार्यक्रम सोमवारी (ता. 24) घरी सुरू होता. भारत शिंगाडे यांच्या घरी दोन-दोन लग्नकार्य असल्याने पाहुणे मंडळींनी घर भरलेले होते. असे असताना अचानक काय झाले कुणास ठावूक. 

फोनवर आली अशुभ बातमी

नवऱ्या मुलांचा पिता भारत शिंगाडे घरी नव्हते. ते कुठेतरी गेले असावे असे घरच्यांना वाटले. एवढ्यात भारत शिंगाडे यांचा भाऊ राजेश शिंगाडे यांना बाहेरून मोबाईलवर फोन आला. त्या फोनवर पलिकडील व्यक्तीने सांगितले की, तुमचा भाऊ भारत चांदूररेल्वे मार्गावर असलेल्या शेतात झाडाला लटकला आहे. ही बातमी मिळताच हळदीचा कार्यक्रम जागच्या जागी थांबून पाहुणे मंडळीसह घरातील सर्वजण शेताकडे धावत सुटले. शेतात पोहोचल्यानंतर त्यांनी जे बघितले त्यामुळे तर सर्वांच्या पायाखालची वाळूच सरकली. भारत शिंगाडे यांनी झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे आत्महत्या करतेवेळी भारत यांनी आपल्या चपलासुद्धा गळफास घेतलेल्या दोरीला बांधल्या होत्या. या घटनेची माहिती कुऱ्हा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन झाल्यानंतर भारत शिंगाडे यांच्या मृतदेहावर कुऱ्हा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

लग्न घरी भयाण शोककळा

घरी दोन मुलांच्या लग्नसोहळ्यासारखा आनंदाचा क्षण असताना वडिलांनी अचानक असे केल्याने कुटुंबियांसह अख्खे गाव तब्ध झाले. लग्न घरी तर भयाण शोककळा पसरली होती. वडिलांच्या आत्महत्येमुळे पत्नीसह दोन्ही मुलांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी घटनेचा मर्ग दाखल केला असून भारत शिंगाडे यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Mumbai Ganeshotsav:लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच: चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस

SCROLL FOR NEXT