File photo
File photo 
विदर्भ

अजमेर-रामेश्‍वरम्‌दरम्यान हमसफर एक्‍स्प्रेस

सकाळवृत्तसेवा

अजमेर-रामेश्‍वरम्‌दरम्यान हमसफर एक्‍स्प्रेस
नागपूर : रामेश्‍वरम्‌ आणि अजमेर या प्रसिद्ध धार्मिक ठिकाणांना जोडणारी अजमेर- रामेश्‍वरम्‌ हमसफर एक्‍स्प्रेस नागपूरमार्गे चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या नवीन ट्रेनमुळे अजमेर आणि रामेश्‍वरम्‌ येथे जाऊ इच्छिणाऱ्या नागपूरकर भाविकांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. गाडीला एलएचबी डबे राहणार असल्याने अधिकच आरामदायी प्रवास करता येणार आहे.
19603 अजमेर-रामेश्‍वरम्‌ वातानुकूलित साप्ताहिक हमसफर एक्‍स्प्रेस प्रत्येक शनिवारी रात्री 9.40 वाजता अजमेरहून सुटेल. रविवारी सायंकाळी 7.35 ला नागपूरला पोहोचेल आणि मंगळवारी पहाटे 3 वाजता रामेश्‍वरम्‌ स्थानक गाठेल. 19604 रामेश्‍वरम्‌-अजमेर साप्ताहिक हमसफर एक्‍स्प्रेस प्रत्येक मंगळवारी रात्री 10.15 वाजता रामेश्‍वरम्‌ स्थानकाहून रवाना होईल. बुधवारी मध्यरात्री 2 वाजता नागपूर स्थानक गाठेल आणि गुरुवारी रात्री 11.25 वाजता अजमेर स्थानक गाठेल. या गाडीला भिलवाडा, चंदेरिया, चितोरगढ, निमच, मंदसोर, रतलाम, फतेहबाद चंद्रवाटीगंज, लक्ष्मीबाईनगर, देवास, माकसी, संत हिरदारामनगर, भोपाळ, इटारसी, बैतुल, सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशा, वारंगल, विजयवाडा, नेल्लोर, गुडूर, चेन्नई एगमोर, चेंगलपट्टू, वेल्लुपूरम, अरिअलूर, तिरूचिरापल्ली आणि मानामदुराईस्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 16 तृतीय श्रेणी वातानुकूलित आणि 1 एसी बफेट डबा राहील.
भाविकांना दिलासा
चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या रामेश्‍वरम्‌ कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. त्याचप्रमाणे अजमेर हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. या दोन्ही तीर्थस्थळांना जोडणाऱ्या अजमेर-रामेश्‍वरम्‌ वातानूकुलित साप्ताहिक हमसफर एक्‍स्प्रेसमुळे भाविकांसह उत्तर किंवा दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
गांधी जयंतीपासून आरक्षण
रामेश्‍वरम येथून 2 ऑक्‍टोबरपासून तर अजमेर येथून 6 ऑक्‍टोबरपासून ही नवी सेवा सुरू होणार आहे. दोन्ही गाड्यांसाठी 2 ऑक्‍टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून आरक्षण सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT