Happiness on the face of Muskan after receiving har money on online Transaction 
विदर्भ

दुचाकी घेण्यासाठी पै पै जमवली, एके दिवशी एक कॉल आला आणि...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : दुचाकी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून एका दुकानात काम केले. 80 हजार बॅंकेत जमाही केले. परंतु, तोतयाने तिला जाळ्यात अडकवून खात्यातील 80 हजार रुपये लंपास केले. मात्र, घटनेनंतर दीड तासात ती आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात पोहचली. अन्‌ लंपास केलेल्या रकमेपैकी 74 हजार 500 रुपये तिच्या खात्यात जमा झाल्याने तिला प्रचंड आनंद झाला.

मुस्कान अनिलकुमार धिंग्रा (वय 22, रा. रामपुरी कॅम्प) ही तिची आई आणि भावासोबत सोमवारी (ता. 15) सायबर पोलिसांचे आभार मानायला आली. मुस्कान सामान्य कुटुंबातील युवती. तिने एका ड्रायफ्रुटच्या दुकानात नोकरी केली. तिला दुचाकी घ्यायची होती. अडीच ते तीन वर्षांमध्ये तिने मिळालेल्या वेतनाची रक्कम स्वत:च्या खात्यात जमा केली. जवळपास 80 हजार रुपये जमा झाले. ती नवीन दुचाकी घेण्यासाठी शोरुममध्ये जाणारसुद्धा होती.

4 जून 2020 रोजी दुपारच्या सुमारास मुस्कानला फोन आला. संपर्क साधणाऱ्याने स्वत:ला कोटक महिंद्रा बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी केली. तिने घेतलेले एटीएम कार्ड बंद होणार असल्याचे सांगितले. तिच्याकडून एटीएमकार्डवरील गोपनीय क्रमांक विचारला. त्यानंतर तिच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी तिने शेअर केला. त्यामुळे तोतयाने काही मिनिटात फोन पेवरून वेगवेगळ्या व्हॅलेटला प्रत्येकी 25 हजार रुपयांचे तीन आणि 5 हजार रुपयांचे एक असे चार ट्रान्झॅक्‍शन केले.

खात्यातून 80 हजार रुपये बेपत्ता झाल्याचा मॅसेज मिळाल्याने तिला धक्काच बसला. तिने दीड तासात सायबर ठाणे गाठले. सायबर पोलिसांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. तोपर्यंत वेगवेगळ्या व्हॅलेटला गेलेल्या 80 हजारांपैकी साडेपाच हजार रुपये तोतयांनी काढून घेतले होते. उर्वरित रक्कम थांबविण्याचे आदेश सायबर पोलिसांनी दिले. त्यामुळे गेलेली रक्कम पोलिसांच्या मदतीने मुस्कानच्या खात्यात परत आली. पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे, हेडकॉन्स्टेबल दीपक बदरके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मुस्कानच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या
कॅशबॅकचे आमिष, शिवाय वेगवेगळ्या लिंक पाठवून डाऊनलोड करायला लावण्यात येतात. अशा पद्धतीने फसवणूक होऊ शकते. बॅंक खात्याचे अपडेट विचारणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून प्रत्येकाने सावध राहावे, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी.
- प्रवीण काळे, पोलिस निरीक्षक सायबर ठाणे, अमरावती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

HSC Exam Form : बारावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्काने भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Pune Crime : 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी; घरझडतीत ५१ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT