Harassment of a young woman in the name of corona test 
विदर्भ

कोरोना चाचणीच्या नावाखाली वेगळीच चाचणी अन्‌ पाठवला `तू खूप सुंदर दिसते' असा मेसेज, वाचा...

संतोष ताकपिरे

अमरावती : विदर्भात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. थोडीही शंका आल्यास स्वॅब करून घेतले जाते. याचाच गैरफायदा अनेकांकडून घेतला जात आहे. कोरोना चाचणीच्या नावाखाली युवतीची छेळ काढल्याचा धक्कदायक प्रकार पुढे आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील एका व्यापार संकुलात संबंधित युवती नोकरी करते. याच व्यापार संकुलात एक व्यक्ती चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे युवतीसह इतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्यासाठी बडनेरा हद्दीतील एका कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये बोलविले.

महिला अधिकाऱ्यांसोबत चाचणीसाठी युवती लॅबमध्ये गेली. यावेळी युवतीसह इतरांचा स्वॅब घेण्यात आला. त्यानंतर स्वॅब घेणारा लॅब टेक्‍निशियन अलकेश अशोक देशमुख (वय 25, रा. पुसदा) याने संबंधित युवतीस "तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे' असे सांगितले. शिवाय दुसरी युरिनल चाचणी करावी लागेल, असे सांगून तिला थांबवून ठेवले. 

शासकीय लॅबमध्ये महिला कर्मचारी नसल्याने युवतीसोबत आलेल्या दुसऱ्या महिला अधिकाऱ्यांस लॅब टेक्‍निशियन अलकेशने थांबवून ठेवले. महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच अलकेशने युवतीची दुसरी चाचणी घेतली. त्यासाठी कोविड टेस्टिंग किट्‌सचाही वापर केला. काही मिनिटांत दुसरी चाचणी घेणाऱ्या अलकेशने युवतीला ती चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले.

युवतीला अलकेशच्या वर्तणुकीवर शंका आली. तिने आपल्या भावाला घटनाक्रम सांगितला. युवतीच्या भावाने जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन स्वॅब टेस्ट नंतर कोरोना चाचणीसाठी युवतीले दिलेल्या टेस्टबाबत चौकशी केली असता स्वॅब व्यतिरिक्त दुसरी कोणतीही चाचणी त्यासाठी करावी लागत नाही, असे डॉक्‍टरांनी सांगितले. 

दुसरीच चाचणी घेणाऱ्या अलकेशने युवतीचा मोबाईल क्रमांक घेतला अन्‌ तिला थोड्या वेळाने "तू खूप सुंदर दिसते, माझ्याशी मैत्री करशील काय?' असा मेसेजही पाठविला. युवतीच्या लॅबटेक्‍निशियनचा उद्देश लक्षात आला. तिने बडनेरा ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अलकेश देशमुखविरुद्ध विनयभंगासह आयटी ऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

दुसऱ्याच प्रकारची चाचणी देण्यास पाडले भाग

कोरोना चाचणीसाठी आवश्‍यक स्वॅब घेतल्यानंतर लॅब टेक्‍निशियनने युवतीला गरज नसतानाही दुसऱ्याच प्रकारची चाचणी देण्यास भाग पाडले. एवढ्यावरच त्याचे समाधान झाले नाही म्हणून तपासणी झालेल्या युवतीला दुसऱ्याच दिवशी "तू खूप सुंदर दिसते, माझ्यासोबत मैत्री कर!' असा मॅसेज पाठवला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून जेरबंद केले.

शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी 
प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल होताच लॅब टेक्‍निशियन अलकेशला रात्रीच अटक केली. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
- पंजाब वंजारी, 
पोलिस निरीक्षक, बडनेरा ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamuna Expressway Accident: मध्यरात्री धुक्यात अचानक आगीचा भडका… क्षणात पेटल्या ८ बस-कार; प्रवासी जीवंत जळाले... रात्रीचा थरारक क्षण

Solapur Crime:'विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ'; वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा, जन्मठेपेची शिक्षा अन्..

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्‍चित..

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

Pune News : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा उपक्रम; शहराच्या सर्वांगीण विकासावर फडणवीसांचा जोर!

SCROLL FOR NEXT