hariyana two hundred fifty village road maratha washin news 
विदर्भ

हरियाणाच्या या अडिचशे गावात वसतो महाराष्ट्र

राम चौधरी

पानीपत/वाशीम : गावाच्या प्रत्येक फाट्यावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा, गावातील प्रत्येक घरावर मराठा भवन चिन्हांकीत आणि डौलाने फडकणारा जरीपटका हे चित्र महाराष्ट्राच्या गावातील नसून, हरियाणा राज्यातील पाच जिल्ह्यातील अडिचशे गावात महाराष्ट्राचे दर्शन घडविणारे आहे.

पानीपत महाराष्ट्राच्या अंगावर आजही सरसरून काटा आणणारा शब्द. हा शब्द प्रचंड पराभवाची व्याख्या ठरला. 1761 मध्ये झालेल्या पानीपताच्या लढाईत महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील योद्धा धारातिर्थी पडला. या पराभवानंतर अहमद शहा अब्दालीने हजारो युध्दबंदी अफगाणीस्तानात सोडले तर उरलेले अडिचशे वीर पानीपताजवळ असलेल्या जंगलात आश्रयाला गेले. जंगलाच्या बाहेर निघावे तर मरणाची भीती होती अहमदशहाने तर मराठा सैनिकाच्या एक शिराच्या बदल्यात एक सुवर्ण मुद्रा देण्याची द्वाही फिरवली होती. या परिस्थितीत जंगलाच्या आश्रयाला गेलेल्या या विरांनी अख्खे एक-दीड शतक या जंगलात काढली. इग्रंजी राजवटीत प्रथम यांची जनगणना करण्यात आली त्यावेळी या मराठा बांधवांची लोकसंख्या अठ्ठाविस हजार होती. हरियाणा राज्यातील मुळ रहिवासी दाखविण्यासाठी रोड उपनाम घेतले गेले. भाटाजवळ वंशावळ बनविली गेली तेव्हा कुठे या रोड मराठा समाजाला इंग्रजांनी ते राहत असलेल्या जंगलातील जमीन नावाने करून दिली. जास्त जमीन मिळवून घेण्यासाठी हा समाज चार जिल्ह्यामध्ये विभागला आज हरियाणातील पानीपत, करनाल, कुरूक्षेत्र, सोनीपत या चार जिल्ह्यामध्ये तब्बल अडिचशे गावात बहुसंख्यांक आहे तर दोनशे गावामधे एकूण लोकसंख्येच्या विस टक्के आहे.

छत्रपती की जय एकच ओळख
महाराष्ट्रामधे आपण शिंक आल्यानंतर हे राम म्हणतोच. ते का म्हणतो, हे सांगता येत नाही तसेच हरियाणामधे रोड मराठा समाजात शिंक आल्यानंतर ‘छत्रपतीकी जय’ हा शब्द हा शब्द आपसूक बाहेर पडतो. हा शब्द का येतो हे विचारल्यानंतर आमच्या अनेक पिढ्या हाच शब्द वापरतात, म्हणून आम्हीही म्हणतो, असे उत्तर मिळते.

गावागावात शिवरायांची प्रतिमा
हरियाणातील तब्बल अडिचशे गावांची प्रवेशद्वारे शिवरायांच्या प्रतिमांनी उजळलेली आहेत. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा प्रत्येक घरात लावलेली आहे. प्रत्येक घरावर मराठा भवन लिहलेले असून, छत्रपतींचा जरीपटका प्रत्येक घरावर डौलाने फडकतो.

बोलीभाषेत मराठीचा वास
हरियाणा राज्याची भाषा मुख्यतः हरियानवी आहे. मात्र रोड मराठा समाजाच्या बोलीभाषेत आजही बहुसंख्य मराठी शब्द आजही उच्चारले जातात. फेट्याला महाराष्ट्रात ग्रामीण भागात आजही पटका शब्द वापरला जातो. तो या रोडमराठा समाजातही वापरला जातो. दरवाजाला कवाड, म्हैस, खाट, आईला माय, चुल,पुरणपोळी, होण मण, हे शब्द फक्त रोडमराठा समाजातच वापरले जातात.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये धर्मशाळा
या समाजाने हरियाणा संस्कृतीचा अंगीकार केला असला तरी मुळ मराठी संस्कृतीशी नाळ कायम आहे. लग्नसमारंभात मराठी संस्कृतीची झलक असतेच. या समाजाने हरियाणात प्रगतीचा मोठा पल्ला गाठला आहे. दरघरटी एक जण परदेशात आहे हरियाणा राज्याची उपजावू जमीन या रोड मराठा समाजाच्या ताब्यात आहे. चार जिल्हे आणी बारा तालुक्यात रोड मराठा समाजाच्या धर्मशाळा आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT