Harshavardhan Deshmukh 
विदर्भ

हर्षवर्धन देशमुख म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण हे गोरगरिबांवरील संकट! 

सुधीर भारती

अमरावती ः शिक्षण हा केंद्र व राज्य या दोन्हींच्या अधिकारातील प्रश्‍न असताना नवीन धोरण निश्‍चित करताना राज्यांना विश्‍वासात घेण्यात आले नाही. हे शैक्षणिक धोरण गरिबांवरील फार मोठे संकट असून या धोरणाशी राज्याने शंभर टक्‍के सहमत होऊ नये, असे प्रतिपादन श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले.

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित संस्थेच्या ‘शिवाजी डॉट लाइव्ह’ या यू-ट्यूब वाहिनीचा शुभारंभ, संस्थेची दैनंदिनी आणि शिवसंस्था त्रैमासिकच्या जयंती विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन फुंडकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, केशव मेतकर, प्राचार्य केशव गावंडे, माजी न्यायाधीश अशोक ठुसे, सचिव शेषराव खाडे, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ. वि. गो. ठाकरे, नरेशचंद्र पाटील, डॉ. अमोल महल्ले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे व डॉ. रामचंद्र शेळके हे ऑनलाइनच्या माध्यमाने या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात वीर उत्तमराव मोहिते लिखित ‘जागतिक कृषक क्रांतीचा उद्‌गाता’ या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन आणि डॉ. मंदा नांदूरकर यांच्या मातोश्री विमलाबाई देशमुख, या पुस्तकाचे प्रकाशनसुद्धा करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंदा नांदूरकर यांनी, तर हेमंत काळमेघ यांनी प्रास्ताविक केले. आभार संस्था सचिव शेषराव खाडे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीवन सदस्य अशोक देशमुख, प्रभाकर फुसे, वीर उत्तमराव मोहिते यांच्या कन्या भाग्यरेखा देशमुख, प्राचार्य डॉ. संयोगीता देशमुख, प्राचार्य डॉ. शशांक देशमुख, शिवसंस्था त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक डॉ. कुमार बोबडे, संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT