Propose Sakal
विदर्भ

चक्क न्यायालयाच्या परिसरातच त्याने घातली 'तिला' लग्नाची मागणी; नात्याला मिळाली आणखी एक संधी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कौटूंबिक न्यायालय म्हटले की दाम्पत्याची होणारी भांडणे, कलहापर्यंत गेलेला कौटूंबिक वाद अन्‌ जोडप्यांची विभक्ती हेच चित्र प्रथम डोळ्यापुढे येते. मात्र, नागपूर येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये त्या उलट चित्र पाहायला मिळाले.

प्रकरण कौटूंबिक न्यायालयात दाखल असताना एका पतीने पत्नीला गुलाब पुष्प देत नव्या आयुष्यासाठी मागणी घातली. निमित्त होते कुटुंबदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. अतिशय भावनावश होऊन काही जोडप्यांनी एकमेकांना गुलाबपुष्प देऊन पुन्हा नवीन आयुष्यासाठी प्रपोज केले.

या उपक्रमात सहभागी झालेल्या इतर जोडप्यांपैकी दोन जोडप्यांनी लगेचच आपले प्रकरण मागे घेऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. एका जोडप्याने संमतीने घटस्फोटाच्या निकालाची अंतिम तारीख असली तरी पुन्हा विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला.

कौटुंबिक न्यायालय, नागपूर येथे कुटुंब दिनाच्या निमित्ताने कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणातील जी जोडपी एकत्र राहण्यासाठी गेलेली आहेत किंवा जी एकत्र राहण्यासाठी जाऊ इच्छितात अशा सर्व पक्षकारांना एकत्र बोलावून पती-पत्नीच्या नात्यातील गैरसमज कसे दूर व्हावेत आणि नाते कसे टिकवावे, कौटुंबिक सौख्यासाठी काय करायला हवे आणि काय टाळायला हवे याबाबत समूह समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाला प्रमुख न्यायाधीश मंगला ठाकरे, न्यायाधीश विश्वास पाठक आणि न्यायाधीश शुद्धोधन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. एकत्र राहिला गेलेल्या जोडप्यांना डॉ. स्मिता जोशी यांचे ‘कौटुंबिक वादासाठी विशेष न्यायालय : कौटुंबिक न्यायालय’ हे पुस्तक आणि पुष्प देत सत्कार करण्यात आला.

त्यानंतर न्यायाधीश शुध्दोधन मोरे यांनी एकमेकांशी कसे जुळवून घ्यावे, नाती कशी टिकवावीत याबाबत मार्गदर्शन केले. न्यायाधीश विश्‍वास पाठक कोणतीही व्यक्ती परिपुर्ण नाही. चुका सर्वांकडून होतात. पण, एकमेकांच्या चुका शोधत बसण्यापेक्षा एकमेकांना माफ करून कस पुढे जावे, या बाबतीत मार्गदर्शन केले.

प्रमुख न्यायाधीश मंगला ठाकरे यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी सांगितले की, आपल्या अपेक्षांप्रमाणे सर्व घडत नाही. पण प्रत्येक वेळेला, ‘मै सही तू गलत’ असं म्हणण्यापेक्षा एकमेकांचा आणि कुटुंबाचा स्वीकार करून आपले कुटुंब टिकवावे.

कौटुंबिक न्यायालयातील विवाह समुपदेशक दिपाली देशमुख आणि संगीता गांजरे यांनी उपस्थित जोडप्यांना संशय, गैरसमज, सोशल मीडियाचा प्रभाव आणि संघर्षात्मक परिस्थितीत निर्माण होणारे ताणतणाव इत्यादी विषयावर विविध रोल प्ले करून दाखवले.

या माध्यमातून व विविध खेळांच्या माध्यमातून डॉ. स्मिता जोशी व दिपाली देशमुख यांनी उपस्थित जोडप्यांना मार्गदर्शन केले . परस्परांचं नातं समृद्ध होण्यासाठी काय करायला हवं आणि काय टाळायला हवं याबाबत मार्गदर्शक सूचना चर्चेच्या माध्यमातून देण्यात आल्या. एकूण २० जोडप्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT