He blackmailed the girl by taking Rs four lakh 
विदर्भ

ब्युटीपार्लरमध्ये येणाऱ्या युवतीला महिला पैशांसाठी करायची ब्लॅकमेल, वाचा...

संतोष तापकिरे

अमरावती : वर्षभरापूर्वी युवतीची ओळख ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेसोबत झाली. युवती तिच्या ब्युटीपार्लरमध्ये चेहऱ्याच्या मसाजसाठी जात होती. ती महिला नेहमी तिला कशाचे तरी पाणी पिण्यासाठी देत होती. हे पाणी पिल्याने शरीर चांगले राहते, अशी बतावणी तिने केली. यानंतर तिचे अश्‍लील फोटो काढून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी युवतीची ओळख एका ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेसोबत झाली. महिलेने तिची ओळख अन्वर हुसेन मेहमूद हुसेन (रा. पॅराडाइज कॉलनी) याच्यासोबत करून दिली. अन्वरने युवतीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. विश्‍वास संपादन केल्यानंतर अन्वर व महिलेने युवतीला अश्‍लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अन्वरने त्याआधारे युवतीकडून चार लाख तर ब्युटीपार्लर चालविणाऱ्या महिलेने एक लाख रुपये हडपले.

त्यानंतरही महिला युवतीला मसाज करण्याच्या बहाण्याने ताजनगरात नेहमीच घेऊन जायची. तेथेच अन्वरने चार वेळा आपल्यावर अत्याचार केला, असे तक्रारीत युनतीने नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी महिलेने अन्वरसोबत युवतीला चिखलदरा येथे नेले. तेथे अन्वरने तिच्यावर अत्याचार केला. युवतीच्या तक्रारीवरून अन्वर हुसेनसह कटात सहभागी महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी सांगितले. 

लिंबू सरबतमध्ये दिले गुंगीचे औषध

ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या महिलेने मसाजसाठी येणाऱ्या युवतीला लिंबू सरबतमध्ये दिले गुंगीचे औषध देण्यात सुरुवात केली. हे पाणी पिल्याने शरीर चांगले राहते, अशी बतावणी केली. युवती बेशुध्द झाल्यानंतर अश्‍लील फोटो काढून ठेवले. वर्षभरापासून अश्‍लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करणे सुरू केले. तसेच दुसऱ्याला ते फोटो देऊन अत्याचार केला. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य सुत्रधार महिलेसह अन्वरवर गुन्हा दाखल केला आहे.

ठार मारण्याची धमकी

सततची धमकी, अत्याचार व पैशांच्या मागणीला कंटाळून युवतीने नागपुरीगेट पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. 30) गुन्हा दाखल केला. तक्रारीवरून अन्वर हुसेनविरुद्ध अत्याचारासह खंडणी वसुली, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तर महिलेविरुद्ध अन्वरला कटात सहकार्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

लग्न होऊ न देण्याची धमकी

अन्वरने युवतीला तिचे लग्न दुसऱ्यासोबत होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. त्याच्याकडे लग्नाचा पुरावा असल्याचे सांगून ब्लॅकमेल करीत अत्याचार करीत होता, असेही पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

 संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बच्चू कडू अन् आंदोलकांच्या तावडीत सापडले भाजप आमदार; 4 तास बसवून ठेवलं

Pune Airport : उत्कृष्ट सेवेमुळे पुणे विमानतळ 'नंबर वन', एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी सर्वेक्षणात सर्वोच्च रेटिंग

Panchang 29 October 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्र पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

Neelam Gorhe: लोककलांच्या जतनासाठी समिती स्थापन करा : डॉ. नीलम गोऱ्हे; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात विविध लोककला अमूल्य वारसा

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT