yoga day 
विदर्भ

तलावाच्या पाण्यावर योगा करून त्यांनी साजरा केला जागतिक योगा दिन 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जागतिक योगदिनी सामूहिक योगासने करण्याचे समारंभ आयोजित केले गेले नसले तरी, स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेकांनी सुरक्षितता लक्षात घेऊन आपल्या परीने योगासने केली.

आयुक्तालयाच्या पोलिस मुख्यालयातील शिपाई प्रवीण आखरे यांच्याकडे पोलिस जलतरण तलावाची निगा राखण्याची जबाबदारी आहे. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आखरे यांनी तलावाच्या पाण्यावर विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून फिटनेसचा मंत्र दिला. 

पोलिस शिपाई आखरे हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी गठित टिमचे सदस्य आहेत. दरम्यान, पहाटे फिरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खेळांची मैदाने सुरक्षित अंतर ठेवून व्यायामासाठी खुली केली असली तरी जागतिक योगदिनी त्याठिकाणी गर्दी दिसत नाही. शहरातील छत्री तलाव, चांदूररेल्वे मार्गासह निर्जनस्थळी फिरायला जाणाऱ्यांनी नियमित व्यायाम म्हणून योगासने केल्याचे चित्र जागतिक योगदिनी दिसून आले. मालटेकडी परिसरात मात्र शुकशुकाट होता. जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला तरीही जाहीर प्रात्यक्षिक सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले नाही. 

ऑनलाइन योग 

अनेक ठिकाणी झूम ऍप तसेच अन्य माध्यमांतून सामूहिक योगासनात सहभाग नोंदविण्यात आला. त्यात उपस्थित राहणाऱ्यांची संख्यासुद्धा चांगलीच होती. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे पाच दिवसीय वेबिनार सिरीजचे आयोजन करण्यात आले. 

खासदार, आमदारांचा योग 

खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांनी काही युवक व युवतींसोबत आज योगासने केली. कोरोनाच्या या काळात आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगासने उपयुक्त असल्याने सर्वांनी ती करावीत व आपली प्रतिकारशक्ती वाढवावी, असे आवाहन नवनीत राणा यांनी केले. 

शाळांचासुद्धा पुढाकार 

कोरोनामुळे सध्या सर्व शाळा बंद असल्या तरी येथील मणीबाई गुजराथी शाळेने "लॉकडाउन में होगा, मणीबाई मे योगा' अशी थीम निश्‍चित करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT