whatsapp_status 
विदर्भ

त्याने दुसऱ्याच्या पत्नीचे स्टेटस ठेवले आणि...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : व्हॉटस ऍप आणि एकूणच सोशल मीडिया हे आजकाल अनेकदा भांडणाचे आणि वैराचेही कारण ठरते. एकमेकांना पाठवलेल्या पोस्टस किंवा न पाठवलेल्या पोस्टस, कोणी ठेवलेले डीपी, व्हायरल केलेली माहिती आणि बरेच काही... यामुळे नात्यांमध्येही दूरावा येतो. नवराबायकोच्या नात्यात संशय निर्माण करणारे सोशल मीडिया हे अलिकडे मोठे कारण ठरत आहे.
असाच एक प्रकार अमरावती येथे घडला. व्हॉटसऍपच्या स्टेटसवरूनच दोन भावांमध्ये जुंपली. लहान भावाने त्याच्या व्हॉटसऍपमध्ये मोठ्या भावाच्या पत्नीचे स्टेट्‌स ठेवले. यावरून दोन भावांमध्ये हाणामारी झाली. परस्परांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली. स्थानिक कल्याणनगर येथे हा प्रकार घडला.
दोघेही एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात. त्यापैकी एक विवाहित आहे. या दोन्ही भावांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून नेहमीच खटके उडत असतात. यापूर्वीही एकाने दुस-याविरुद्ध तक्रार दिली होती. ती तक्रार का दिली, या कारणावरून सोमवारी (ता. आठ) दुपारी दोघांनी एकमेकांना मारहाणही केली. तुला चाकूने मारल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिल्याचे भावानेच दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, तर तो कोणत्याही कारणावरून भांडतो. माझ्या पत्नीच्या नावाचे स्टेट्‌स व्हॉटसऍपवर का ठेवले?, असे त्याला विचारले असता त्याने अश्‍लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दुस-याने नोंदविली आहे.

परस्परविरोधी तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध अश्‍लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हे नोंदविले आहेत. या सगळ्या प्रकारात जिचे स्टेटस ठेवले आहे तिची काहीही प्रतिक्रिया कळू शकली नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT